Honda New Scooter : होंडा ही एक दिग्गज ऑटो कंपनी आहे. ही एक प्रमुख टू व्हीलर निर्माती कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक टू व्हीलर ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत.
विशेष म्हणजे स्कूटर सेगमेंट मध्ये कंपनीचा मोठा बोलबाला आहे. होंडा कंपनीची ॲक्टीव्हा स्कूटर ही भारतीयांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. एक्टिवा स्कूटरचे एक लाखांपेक्षा अधिकचे युनिट दर महिन्याला विकले जात आहेत. यावरून एक्टिवा स्कूटरची भारतातील लोकप्रियता किती अधिक आहे हे आपल्या लक्षात येते.

दरम्यान, नवीन स्कूटर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी होंडा कंपनी लवकरच एक मोठी भेट देणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार होंडा लवकरच एक नवीन स्कूटर लॉन्च करणार आहे.
स्कूटर सेगमेंट आणखी मजबूत बनवण्यासाठी आणि आपला पोर्टफोलिओ आणखी विस्तारावा म्हणून कंपनी लवकरच एक नवीन स्कूटर बाजारात आणणार आहे.
या नवीन स्कूटरचे नुकतेच अनावरण देखील झाले आहे. यामुळे ही स्कूटर लवकरच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार अशी आशा आता व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार होंडा कंपनी होंडा स्टायलो 160 ही स्कूटर लवकरच लॉन्च करणार आहे. या स्कूटरमध्ये 160cc चे दमदार इंजिन दिले जाणार आहे.
दरम्यान आता आपण या स्कूटरचे इतर फीचर्स थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Honda Stylo स्कूटरचे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स कसे आहेत ?
स्टायलो 160cc या स्कूटरला रेट्रो लुक राहणार आहे. या स्कूटरमध्ये अनेक ॲडव्हान्स फीचर्स उपलब्ध राहणार आहेत.
यामध्ये एलईडी हेडलाइट्स, एलईडी डीआरएल, एलईडी टेल लाइट्स, कीलेस स्टार्ट फीचर, कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम (सीबीएस), अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (एबीएस), अलॉय व्हील्स, कलर-मॅच केलेले ORVM, कलर कोडेड फ्लोअरबोर्ड यासारखें भन्नाट फीचर्स राहणार आहेत.
याच्या रंगांबद्दल बोलायचे झाल्यास, Honda Stylo 160 ग्लॅम बेज, रॉयल मॅट ब्लॅक, ग्लॅम रेड आणि रॉयल ग्रीनमध्ये उपलब्ध राहणार आहे.
टॉप-स्पेक Royale प्रकार अधिक महाग असण्याची शक्यता आहे कारण त्याला ABS पर्याय मिळतो. त्यांना तपकिरी रंगाचे फ्लोअरबोर्ड आणि सीट कव्हर्स देखील मिळतात.
Honda Stylo 160 च्या इंजिन बाबत बोलायचं झालं तर यामध्ये सिंगल सिलेंडर लिक्विड कूल्ड इंजिन आहे जे सुमारे 16 bhp ची कमाल पॉवर आणि 15 Nm चे पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम राहणार असा दावा कंपनीने केला आहे.
या स्कूटरचे मायलेज 45 Kmpl एवढे राहणार आहे. या स्कूटरमध्ये 12-इंच अलॉय व्हील, रुंद टायर, फ्रंट डिस्क ब्रेक, RSU टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क आणि बरेच काही असण्याची शक्यता आहे.
यामध्ये सीटखालीही मोठे स्टोरेज मिळू शकते. फक्त Royale प्रकारात सिल्व्हर पेंटेड ग्रॅब रेल आणि सिल्व्हर फ्रंट फोर्क्स मिळणार आहेत.