Hyundai Car Price Drop Down : तुम्ही नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत आहात का ? मग तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. विशेषतः ह्युंदाई या लोकप्रिय ऑटो कंपनीची कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही बातमी विशेष महत्त्वाची ठरणार आहे.
कारण की या ऑटो कंपनीने आपल्या लोकप्रिय ग्रँड i10 या कारवर हजारो रुपयांचा डिस्काउंट जाहीर केला आहे. ही कंपनीची एक एंट्री लेवल हॅचबॅक कार आहे. या कारची लोकप्रियता खूपच अधिक आहे.
दरम्यान कंपनीने या कारवर मार्च महिन्यात 48 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट ऑफर सुरू केला आहे. अर्थातच ग्राहकांना ही गाडी खूपच स्वस्तात खरेदी करता येणार आहे.
यामुळे जर तुमचाही ही गाडी खरेदी करण्याचा प्लॅन असेल तर तुम्हालाही लवकरात लवकर ही गाडी बुक करावी लागणार आहे. विशेष म्हणजे या कारच्या पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन्ही वेरियंटवर डिस्काउंट दिला जाणार आहे.
या डिस्काउंट मध्ये कॅश डिस्काउंट, कॉर्पोरेट डिस्काउंट आणि एक्सचेंज बोनसचा समावेश राहणार आहे. यामध्ये कार्पोरेट डिस्काउंट हा तीन हजार रुपयांचा आणि एक्सचेंज बोनस हा दहा हजार रुपयांचा राहणार आहे.
मात्र व्हेरियंटनुसार कॅश डिस्काउंट बदलणार आहे. यामुळे व्हेरिएंटेनुसार डिस्काउंटची एकूण रक्कम देखील बदलणार आहे.
तसेच 2023 च्या मॉडेलवर वेगळा डिस्काउंट आणि 2024 च्या मॉडेलवर वेगळा डिस्काउंट राहणार आहे. यामुळे आता आपण ही संपूर्ण डिस्काउंट ऑफर समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या वॅरिएंटवर किती डिस्काउंट ?
ह्युंदाई i10 ग्रँड निओस CNG : या वॅरियंटच्या 2023 च्या मॉडेलवर 48 हजाराचा डिस्काउंट मिळतो. मात्र 2024 च्या मॉडेलवर 45,000 चा डिस्काउंट मिळत आहे.
ह्युंदाई i10 ग्रँड निओस पेट्रोल MT : या वॅरियंटच्या 2023 च्या मॉडेलवर 33 हजाराचा डिस्काउंट मिळत आहे. मात्र 2024 च्या मॉडेल वर 28 हजाराचा डिस्काउंट मिळत आहे.
ह्युंदाई i10 ग्रँड निओस पेट्रोल AMT : या वॅरीयंटच्या 2023 च्या मॉडेलवर 23 हजार रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. मात्र 2024 च्या मॉडेल वर अठरा हजाराचा डिस्काउंट मिळत आहे.