Hyundai New Car : भारतात दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आकाशाला गवसणी घालत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती सर्वसामान्यांचे बजेट बिघडवत आहेत. आता कार घेणे सोपे मात्र कारमध्ये पेट्रोल किंवा डिझेल टाकणे उघड अशी ओरड सर्वसामान्यांकडून केली जात आहे. यामुळे एकेकाळी पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनांनी फुल भरलेल्या भारतीय बाजारात आता इलेक्ट्रिक आणि सीएनजी वाहनांची मोठ्या प्रमाणात एन्ट्री होत आहे.
विशेष म्हणजे आता इलेक्ट्रिक आणि सीएनजीचा पुढचा विचार सुरू झाला आहे. आता चक्क पाण्यावर कार चालवली जाणार आहे. हो, पाण्यावर मात्र आपण जे पाणी पितो किंवा समुद्रातील पाण्यावर ही कार चालणार नाही. पाणी ज्या हायड्रोजनपासून तयार होते त्या हायड्रोजनवर ही कार चालणार आहे. ह्युंदाई कंपनी लवकरच हायड्रोजनवर चालणारी कार लॉन्च करण्यात या तयारीत आहे.
कंपनी 1 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होणाऱ्या भारत ग्लोबल एक्सपो मध्ये हायड्रोजन वर चालणाऱ्या कारचे प्रदर्शन करणार आहे. ह्युंदाई Nexo ही कार हायड्रोजन फ्युलवर धावणार आहे. कंपनीने सांगितल्याप्रमाणे, ही हायड्रोजन इंधनावर चालणारे वाहन आहे, जे पर्यायी इंधन तंत्रज्ञानावर आधारित आहे. ह्युंदाईचे म्हणणे आहे की यामुळे इव्हेंटला भेट देणाऱ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानाच्या जवळ नेले जाईल.
याद्वारे लोकांना आगामी तंत्रज्ञान जवळून पाहता येणार आहे. एकंदरीत, ह्युंदाई कंपनी हायड्रोजनवर चालणारी कार प्रदर्शित करत असल्याने लवकरच ही कार बाजारात अधिकृतरित्या विक्रीसाठी लॉन्च होणार यात शंकाच नाही. मात्र ही कार यावर्षीच लॉन्च होणार का हे सांगणे थोडे कठीण आहे. पण भविष्यात हायड्रोजनवर चालणारी कार भारतीय बाजारात दाखल होणारच आहे, हे कंपनीच्या यावरून स्पष्ट होत आहे.
खरे तर पेट्रोल आणि डिझेल आयातीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतोय. यामुळे देशातील पैसा विदेशात जातोय. शिवाय पेट्रोल आणि डिझेलमुळे प्रदूषण देखील वाढत आहे. अशा परिस्थितीत आता सरकारच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहित केले जात आहे. यामुळे सीएनजी अन इलेक्ट्रिक वाहनाची मागणी वाढू लागली आहे.
अशातच आता हायड्रोजनवर चालणाऱ्या कारदेखील बनवल्या जात आहेत. त्यामुळे भविष्यात हायड्रोजनवर चालणारी कार देखील मोठ्या मागणीत असेल हे वेगळे सांगण्याची गरज नाही.