Hyundai Creta N Line या दिवशी होणार लॉन्च ! मिळणार नवीन लक्झरी फीचर्स

Ahmednagarlive24 office
Published:
Hyundai Creta N Line

Hyundai Creta N Line : ह्युंदाई मोटर्सची क्रेटा लोकप्रिय एसयूव्ही कारपैकी एक आहे. अलिडकेच ह्युंदाई मोटर्सने त्यांच्या क्रेटा एसयूव्ही कारचे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च केले आहे. क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

ह्युंदाई मोटर्सकडून क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कारला मिळत असलेला प्रतिसाद पाहता आता त्यांची क्रेटा पुन्हा एकदा नवीन अवतारात सादर केली जाणार आहे. ह्युंदाई मोटर्स Creta चे N Line व्हेरियंट लॉन्च करणार आहे.

ह्युंदाई मोटर्सकडून Creta N Line एसयूव्ही कारचे बुकिंग देखील सुरु केले आहे. तुम्हालाही Creta N Line एसयूव्ही कार खरेदी करायची असेल तर तुम्ही 25,000 रुपयांमध्ये ही कार बुकिंग करू शकता. ह्युंदाई डिलरशिप किंवा ह्युंदाई मोटर्सच्या अधिकृत वेबसाईटवरून तुम्ही ही कार सहज खरेदी करू शकता.

क्रेटा एसयूव्ही कारचे डिझाईन आणखी स्पोर्टी बनवण्यात आले आहे. क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कारपेक्षा क्रेटा एन लाइनचे केबिन स्टँडर्ड असेल. तसेच या कारमध्ये नवीन रंग पर्याय देखील दिला जाईल. सध्या क्रेटा दोन-टोन ग्रे आणि ब्लॅक इंटीरियर थीमसह विकली जात आहे. क्रेटा एन लाइनमध्ये सर्वत्र स्पोर्टी ऑल-ब्लॅक फिनिश पाहायला मिळेल.

10.25-इंचाच्या टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीमच्या खालच्या भागात आणि ऑल-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोलला कव्हर केल्यामुळे लाल ॲक्सेंट संपूर्ण डॅशबोर्डवर पाहिला जाऊ शकतो.

क्रेटा N Line वैशिष्ट्ये

क्रेटा N Line एसयूव्ही कारमध्ये ड्युअल-पेन सनरूफ, 6 एअरबॅग्ज, एसी ड्रायव्हर आणि फ्रंट पॅसेंजर सीट, लेव्हल 2 एडीएएस टेक, ड्युअल-झोन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, वायरलेस स्मार्टफोन चार्जरसह अनेक मानक वैशिष्ट्ये दिली जाणार आहेत.

क्रेटा N Line एसयूव्ही कारमध्ये 1.5L टर्बो GDI चार-सिलेंडर पेट्रोल इंजिन दिले जाईल. हे इंजिन 160 PS पॉवर आणि 253 Nm पीक टॉर्क तयार करण्यास सक्षम असेल. लवकरच ह्युंदाई मोटर्सकडून त्यांच्या क्रेटा N Line ची किंमत देखील जाहीर केली जाईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe