Hyundai New Car : नवीन कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. जर तुम्हीही नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर ह्युंदाई कंपनी तुम्हाला एक मोठी भेट देण्याच्या तयारीत आहे.
ती म्हणजे कंपनी लवकरच आपल्या लोकप्रिय क्रेटाचे N लाईन मॉडेल लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे या एसयूव्ही कारची लॉन्चिंग डेट देखील समोर येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार कंपनी 11 मार्च 2024 ला ही नवीन SUV बाजारात लॉन्च करू शकते.
त्यामुळे जर तुम्हाला पुढील महिन्यात नवीन कार खरेदी करायची असेल तर ह्युंदाई कंपनीची ही नवीन गाडी तुमच्यासाठी एक बेस्ट पर्याय ठरणार आहे. दरम्यान, आता आपण या ह्युंदाईच्या Creta N Line SUV चे फिचर्स अन स्पेसिफिकेशन थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
क्रेटा N लाईनच्या विशेषता
गेल्या महिन्यात ह्युंदाई कंपनीने क्रेटाचे अपडेटेड व्हर्जन लॉन्च केले होते. आता कंपनी याच लोकप्रिय कारचे Creta N Line वर्जन भारतात 11 मार्च 2024 ला लॉन्च करणार अशी बातमी समोर आली आहे.
खरे तर या गाडीची आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री सुरू आहे मात्र भारतात अजूनही ही गाडी लॉन्च झालेली नाही. पण आता अकरा मार्चला ही गाडी भारतात देखील लाँच होणार आहे.
मीडिया रिपोर्ट नुसार या गाडीमध्ये 18-इंच अलॉय व्हील्स मिळतात, जे 17-इंचांपेक्षा वेगळे असतात. सिग्नेचर ब्लू, रेड फिनिश आणि मॅट ग्रे शेड अशा कलर पर्यायांमध्ये ही गाडी उपलब्ध राहणार आहे.
या गाडीच्या फ्रंट आणि बॅक बंपरलाही नवा लुक देण्यात आला आहे. या SUV च्या केबिनच्या आत, एक स्लीक ऑल-ब्लॅक स्पोर्टी इंटीरियर समाविष्ट केले जाईल, जे गीअर लीव्हर, स्टीयरिंग व्हील आणि सीटवर एन लाईन ॲक्सेंटद्वारे वाढवले गेले आहे.
याशिवाय एन लाईन लोगोमुळे बाह्यभागही सुंदर दिसणार आहे. या गाडीचे एक्सटेरियर आणि इंटेरियर खूपच सुंदर राहणार असून ग्राहकांना ही गाडी नक्कीच आवडेल अशी आशा कंपनीला आहे. या नव्याने लॉन्च होणाऱ्या N Line SUV मध्ये क्रेटा फेसलिफ्टचेच इंजिन दिले जाणार आहे.
ही SUV 36 सुरक्षा मानक सुरक्षा वैशिष्ट्यांसह 70 सेफ्टी फीचर्स बाजारात लॉन्च होण्याची शक्यता आहे. Creta च्या सर्व प्रकारांना मानक म्हणून 6 एअरबॅग मिळतात.
त्यामुळे या नव्याने लॉन्च होणाऱ्या गाडीत 6 एअरबॅग्ज, ऑल-व्हील डिस्क ब्रेक आणि इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण यांसारखी अनेक प्रगत फीचर्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत.