नवीन कार खरेदीसाठी पैसे तयारच ठेवा…! ह्युंदाई लवकरच लॉन्च करणार ‘ही’ SUV कार

Published on -

Hyundai New SUV Car : मारुती सुझुकी ही भारतातील सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी आहे. यानंतर भारतात सर्वात जास्त कार विक्री करण्याचा भीष्म पराक्रम ह्युंदाई या कंपनीने करून दाखवलेला आहे. ह्युंदाई ही भारतात खूपच लोकप्रिय झाली आहे. या कंपनीच्या अनेक गाड्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय असून कंपनी बाजारात लवकरच एक नवीन एसयूव्ही कार लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आले आहे.

कंपनीची नवीन कार जून 2024 पर्यंत ग्राहकांसाठी बाजारात उपलब्ध करून देईल असा दावा देखील होत आहे. यामुळे जर तुमचाही नवीन कार खरेदी करण्याचा प्लॅन असेल तर तुम्हाला तुमचा बजेट तयार करून ठेवावा लागणार आहे. कारण की ह्युंदाई कंपनीची ही नवीन कार तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरू शकते. दरम्यान आता आपण कंपनी कोणती नवीन कार बाजारात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे, या नवीन कारचे फीचर्स कसे असतील याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

ह्युंदाई कंपनी लॉन्च करणार ही नवीन कार

मिळालेल्या माहितीनुसार ह्युंदाई कंपनी जून 2024 पर्यंत आपल्या लोकप्रिय अल्काजार या एसयूव्ही कारचे फेसलिफ्ट वर्जन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. अल्काजार फेसलिफ्ट भारतीय रस्त्यांवरील चाचणीदरम्यान अनेक वेळा स्पॉट झाली आहे. यामुळे ही गाडी भारतीय बाजारात लवकरच लॉन्च होणार हे जवळपास नक्की आहे.

अशातच मीडिया रिपोर्ट मध्ये जून महिन्यात या गाडीची लॉन्चिंग होऊ शकते असा दावा होऊ लागला आहे. कंपनीकडून याबाबत अधिकृत माहिती समोर आलेले नाही मात्र अनेकदा ही गाडी भारतीय रस्त्यांवर चाचणीसाठी दिसली आहे, यामुळे जून महिन्यापर्यंत ही गाडी बाजारात येऊ शकते यात शंकाच नाही. दरम्यान आता आपण या गाडीचे फीचर्स, लूक अन इंजिन याविषयी थोडक्यात समजून घेणार आहोत.

कारच्या डिझाईनमध्ये बदल होणार का 

अनेकांच्या माध्यमातून ह्युंदाई कंपनीच्या या नवीन फेसलिफ्ट वर्जन कारच्या डिझाईन मध्ये बदल होणार की नाही हा प्रश्न उपस्थित केला जात होता. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की या नव्याने लॉन्च होणाऱ्या कारच्या डिझाईन मध्ये खूपच अमुलाग्र बदल होणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, Hyundai Alcazar फेसलिफ्टमध्ये LED DRL सिग्नेचर साठी राहणार आहे. कंपनी Alcazar फेसलिफ्टमध्ये 18 इंच अलॉय व्हील देऊ शकते, असा दावा केला जात आहे. कारच्या मागील भागात फीचर कनेक्टेड एलईडी टेललाइट दिले जाणार आहे.

या नव्याने लॉन्च होणाऱ्या कारच्या आतील भागात डॅशबोर्ड हा आधीच्या कारसारखाच दिला जाऊ शकतो. हा डॅशबोर्ड ट्विन हॉरिझॉन्टल डिस्प्लेसह सुसज्ज राहील. याशिवाय ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल पॅनल, नवीन स्टीयरिंग व्हील आणि नवीन सेंटर कन्सोल देखील कारमध्ये मिळू शकतात, अशी माहिती रिपोर्ट मधून समोर येत आहे.

कारचे इंजिन कसे राहणार ? 

आता आपण या नव्याने लॉन्च होणाऱ्या Alcazar फेसलिफ्टचे इंजिन कसे राहणार या संदर्भात महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर या नव्याने लॉन्च होणाऱ्या एसयूव्हीमध्ये 1.5 लीटर 4-सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते. हे इंजिन 160bhp ची कमाल पॉवर आणि 253Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम राहणारा असा दावा करण्यात आला आहे.

याशिवाय, ग्राहकांना कारमध्ये 1.5 लीटर टर्बो डिझेल इंजिन देखील मिळू शकते जे जास्तीत जास्त 115bhp पॉवर आणि 250Nm चा पीक टॉर्क जनरेट करेल. कारचे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स, 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर आणि 7-स्पीड डीसीटीशी जोडले जाईल. आगामी Alcazar फेसलिफ्टमध्ये लेव्हल-2 ADAS तंत्रज्ञान देखील प्रदान केले जाऊ शकते.

किंमत किती राहणार?

ही गाडी जून महिन्यापर्यंत लॉन्च होण्याची शक्यता आहे. मात्र अजून तरी कंपनीच्या माध्यमातून लॉन्चिंग डेट बाबत सुचित करण्यात आलेले नाही. शिवाय कंपनीकडून या कारच्या संभाव्य किमती बाबत देखील काहीच अपडेट मिळू शकलेली नाही. यामुळे या गाडीची किंमत किती राहणार हे खरेच पाहण्यासारखे ठरणार आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!