बाजारात धुमाकूळ घालायला लवकरच येत आहे ह्युंदाईची इलेक्ट्रिक क्रेटा! 7.9 सेकंदात घेते 0-100kmph चा वेग व देईल 473 किमीची रेंज

कंपनीने आता इलेक्ट्रिक कार बाजारपेठेमध्ये प्रवेश केला असून 2 जानेवारी रोजी या कंपनीने त्यांच्या लोकप्रिय मध्यम आकाराची एसयुव्ही क्रेटाची इलेक्ट्रिक एडिशन उघड केली असून ही इलेक्ट्रिक कार आगामी येणाऱ्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2025 मध्ये लॉन्च केली जाणार आहे.

Ajay Patil
Published:
hyundai creta ev

Hyundai Creta EV:- भारतामध्ये ज्या काही कंपन्यांच्या कार ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत त्यामध्ये ह्युंदाई मोटर्स इंडिया या कंपनीच्या देखील अनेक कार्स ग्राहकांच्या अत्यंत पसंतीच्या व भारतामध्ये लोकप्रिय ठरलेल्या आहेत.

या कंपनीने आता इलेक्ट्रिक कार बाजारपेठेमध्ये प्रवेश केला असून 2 जानेवारी रोजी या कंपनीने त्यांच्या लोकप्रिय मध्यम आकाराची एसयुव्ही क्रेटाची इलेक्ट्रिक एडिशन उघड केली असून ही इलेक्ट्रिक कार आगामी येणाऱ्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2025 मध्ये लॉन्च केली जाणार आहे.

ह्युंदाई क्रेटा ईव्ही दोन बॅटरी पॅक पर्यायसह ऑफर केली जाणार असून त्यामध्ये एक बॅटरी पॅक हा 51.4kWh आणि दुसरा 42kWh क्षमतेचा आहे. इतकेच नाही तर ही इलेक्ट्रिक क्रेटा प्रीमियम, एक्सलन्स, एक्झिक्युटिव्ह आणि स्मार्ट अशा चार प्रकारांमध्ये उपलब्ध असणार आहे.

पूर्ण चार्जवर देईल 473 किमीची रेंज
या कारच्या रेंजबद्दल कंपनीने दावा केला आहे की पूर्ण चार्ज केल्यावर ही कार 473 किमी पर्यंतची रेंज देईल. इतकेच नाही तर 7.9 सेकंदामध्ये शून्य ते शंभर किलोमीटर प्रतितासचा वेग देखील ती पकडू शकते.

इतकेच नाहीतर या कारमध्ये लेव्हल दोन ऍडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टम सोबत सत्तर पेक्षा जास्त सुरक्षा वैशिष्ट्ये देखील मिळतील अशी शक्यता आहे.

विशेष म्हणजे ह्युंदाई कंपनीची ही सर्वात स्वस्त असलेली इलेक्ट्रिक कार असणार आहे. जर या कारच्या किमतीचा विचार केला तर साधारणपणे सुरुवातीची एक्स शोरूम किंमत वीस लाख रुपये ठेवली जाईल अशी शक्यता आहे.

कशी आहे बाहेरील डिझाईन?
या इलेक्ट्रिक क्रेटाचे जे काही बाहेरील डिझाईन आहे ते नियमित क्रेटा एसयूव्ही सारखेच ठेवण्यात आलेले आहे. ज्याप्रमाणे नेहमीच्या क्रेटाला पुढच्या बाजूला एलईडी डेटा टाईम रनिंग लाइट्स, वर्टीकल ड्युअल पॉड एलईडी हेडलाईट जोडलेले आहेत अगदी त्याचप्रमाणे या इलेक्ट्रिक क्रेटाला देखील डिझाईन करण्यात आलेले आहे.

तसेच एक लहान चौकोनी तुकडे असलेली एक पिक्सेलिटेड ग्रील देण्यात आलेली आहे व त्याच्या मध्यभागी ह्युंदाईचा लोगो दिला असून त्याच्याखाली चार्जिंग पोर्ट आहे. तसेच खालच्या लोखंडी जाळीवर चार मागे घेणे योग्य एअर व्हेंट्स आहेत जे इलेक्ट्रिक मोटर आणि बॅटरीचे घटक थंड ठेवण्यास मदत करतील.

इतकेच नाहीतर या कारच्या बाजूला एरोडायनामिक डिझाईनसह 17 इंच अलॉय व्हील दिले आहेत. तसेच मागच्या बाजूला कनेक्टेड एलईडी टेल लाईट देण्यात आला आहे जो रेगुलर क्रेटा सारखाच आहे. येथे बुटगेटच्या तळाशी ब्लॅक ट्रिम, पिक्सेल एलिमेंट आणि सिल्वर स्किड प्लेट्ससह नवीन डिझाईन केलेले बंपर देखील प्रदान केले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe