ह्युंदाईच्या ‘या’ कारने काबीज केले 31 टक्के कार मार्केट! विक्रीत ठरली नंबर वन; काय आहे या कारमध्ये विशेषता?

भारतीय कार बाजारपेठेमध्ये अनेक नामवंत आणि लोकप्रिय असलेल्या कंपन्यांच्या कार सध्या विक्रीसाठी उपलब्ध असून या कार विविध सेगमेंट आणि विविध किमतींमध्ये ग्राहकांकरिता सादर करण्यात आले आहे. या कंपन्यांमध्ये जर आपण हुंदाई मोटर्स ही कंपनी बघितली तर या कंपनीच्या देखील अनेक सेगमेंट मधील कार प्रसिद्ध असून ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत.

Ajay Patil
Published:
hyundai creta

Hyundai Creta:- भारतीय कार बाजारपेठेमध्ये अनेक नामवंत आणि लोकप्रिय असलेल्या कंपन्यांच्या कार सध्या विक्रीसाठी उपलब्ध असून या कार विविध सेगमेंट आणि विविध किमतींमध्ये ग्राहकांकरिता सादर करण्यात आले आहे. या कंपन्यांमध्ये जर आपण हुंदाई मोटर्स ही कंपनी बघितली तर या कंपनीच्या देखील अनेक सेगमेंट मधील कार प्रसिद्ध असून ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत.

ह्युंदाई कंपनीच्या जर आपण ह्युंदाई क्रेटा या कारच्या दृष्टिकोनातून बघितले तर ही विक्रमी विक्री होणारी कार असून 2024 या वर्षांमध्ये कंपनीच्या एकूण कार विक्रीमध्ये क्रेटाचा हिस्सा 31 टक्के होता.गेल्या वर्षी या कारला तब्बल एक लाख 86 हजार 919 नवीन ग्राहक मिळाले होते व अशा पद्धतीने कंपनीची ही सर्वाधिक विक्री होणारी कार बनली.

या पार्श्वभूमीवर आता कंपनीने क्रेटाची विक्री वाढवण्याकरिता 17 जानेवारीला तिचे इलेक्ट्रिक व्हेरियंट लॉन्च करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे या कारमध्ये असे काय खास आहे की ग्राहकांमध्ये ही कार इतकी लोकप्रिय ठरली? याबद्दलचीच माहिती बघणार आहोत.

ह्युंदाई क्रेटामध्ये काय आहे खास?
या कारच्या केबिनमध्ये नवीन १०.२५ इंच टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, नवीन 10.25 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि व्हाईस सक्षम पॅनोरमिक सनरूफ यासारखी उत्कृष्ट वैशिष्ट्ये देण्यात आले आहेत.

तसेच सत्तर पेक्षा जास्त सेफ्टी फीचर्स या कारमध्ये दिले आहेत. कंपनीने या कारमध्ये सहा एअर बॅग, 360 डिग्री कॅमेरा व त्यासोबत लेव्हल-2 ADAS तंत्रज्ञान देखील समाविष्ट केले आहे.

ह्युंदाई क्रेटामध्ये कसे आहे इंजिन?
जर या कारची पावर ट्रेन बघितली तर या एसयुव्ही मध्ये 1.5- लिटर नॅचरल एक्स्पिरिटेड पेट्रोल इंजिन, 1.5- लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि 1.5- लिटर डिझेल इंजिन दिले आहे. ह्युंदाई क्रेटाची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत अकरा लाख ते वीस लाख तीस हजार रुपये पर्यंत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe