सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर आता मोठ्या प्रमाणावर सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढताना दिसून येत आहे. तसेच कोणताही ग्राहक जेव्हा कार घेण्याचा विचार करतो तेव्हा संबंधित कारची किंमत आणि मायलेज याचा विचार प्रामुख्याने करत असतो.
मायलेजच्या दृष्टिकोनातून बघितले तर सीएनजी इंजिन असलेल्या कारला अधिक पसंती आता ग्राहकांकडून देण्यात येत आहे. समजा तुम्हाला देखील चांगली मायलेज वाली कार घ्यायची असेल व तीही सीएनजी इंजिन असलेली तर ह्युंदाईच्या या सेगमेंटमध्ये दोन कार खूप महत्त्वाच्या आहेत.
त्यांचे मायलेज देखील खूप उत्तम प्रकारचे आहे व या दोन कार म्हणजे ह्युंदाईची Grand i10 Nios आणि Aura या होय. या दोन्हीही नवीन जनरेशन कार असून यामध्ये कंपनीच्या माध्यमातून अनेक नवीन फीचर्स आणि इंजिन देखील पावरफुल देण्यात आलेले आहे.
ह्युंदाईच्या सीएनजी सेगमेंटमधील कारचे वैशिष्ट्ये
1- ह्युंदाई Grand i10 Nios- या कारमध्ये सीएनजी इंजिनचा पर्याय उपलब्ध असून मायलेजच्या बाबतीत या कारबद्दल कंपनीचा दावा आहे की ही कार सीएनजी वर 27 km/kg पर्यंत मायलेज देते. जर आपण या कारची डिझाईन पाहिली तर या कारच्या मागील बंपरवर वाय आकाराचे एलईडी डीआरएल देण्यात आले असून या कारमध्ये सहा मोनोटोन आणि दोन ड्युअल टोन कलर देण्यात आलेले आहेत.
तसेच हुंदाईच्या या कारला एलईडी टेललॅम्प सोबतच प्रोजेक्टर हेडलॅम्प देखील देण्यात आलेले आहेत. तसेच 15 इंचाचे अलॉय व्हिल्स देण्यात आले असून यामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सहा एअरबॅग्स आणि ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम सारखे वैशिष्ट्ये देखील आहेत.
तसेच यासोबत आठ इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देखील आहे. ही कार एरा,मॅग्ना, स्पोर्ट्स आणि अस्टा या चार प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. तसेच या कारमध्ये शार्क फिन अँटेना देखील देण्यात आला आहे. या कारची एक्स शोरूम किंमत बघितली तर ती सात लाख 27 हजार रुपये इतकी आहे.
2- ह्युंदाई Aura- ही कार 5 सीटर असून त्यामध्ये सीएनजी इंजिन उपलब्ध आहे. कंपनीचा मायलेजच्या बाबतीत असलेला दावा बघितला तर ही कार सीएनजीवर 22 km/kg पर्यंत मायलेज देते. ही कार सहा रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असून यामध्ये आठ इंची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम असून 1.2 लिटर पेट्रोल इंजिन देखील आहे.
या माध्यमातून जे ८३ पीएस पावर आणि 114 एनएम पिक टॉर्क जनरेट करते. तसेच या कारमध्ये ऑटो क्लायमेट कंट्रोल आणि सीट अॅडजेस्टचा पर्याय देण्यात आला असून यामध्ये पाच स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे. या कारची एक्स शोरूम किंमत सात लाख 94 हजार रुपये इतकी आहे.