Tata Motors : भारतातील आघाडीच्या वाहन निर्मात्यांपैकी एक, टाटा मोटर्सने आपल्या वाहनांवर बंपर सवलती जाहीर केल्या आहेत. टाटा मोटर्स एप्रिल 2024 मध्ये त्यांच्या अनेक कारवर 1.25 लाख रुपयांपर्यंत सूट देत आहे. ग्राहकांना अधिकाधिक आकर्षित करण्यासाठी ही सूट ऑफर करण्यात आली आहे. कपंनी साध्य Tiago, Tigor आणि Altroz वर डिस्काउंट देत आहे.
एप्रिल 2024 च्या महिन्यासाठी, टाटा मोटर्स MY23 आणि MY24 मॉडेल्सवर आकर्षक सूट देत आहे. पण टाटाच्या सर्वात हॉट सेलर पंचवर कोणतीही सूट नाही. बाकीच्या लोकप्रिय वाहनांवर ही सूट लागू आहे. टाटाच्या कोणत्या गाड्यांवर किती सूट उपलब्ध आहे पाहूया..

MY24 मॉडेल वर्षाच्या वाहनांसाठी, ही सवलत Altroz, Nexon, Tiago आणि Tigor वर लागू आहे. MY24 वाहनांवर सर्वात मोठी सूट Tiago पेट्रोल XT (O), XT आणि XZ ट्रिम्सवर आहे. सर्वात कमी सूट Nexon वर उपलब्ध आहे. टाटा नेक्सॉनवर फक्त 5,000 चा एक्सचेंज/स्क्रॅपेज बोनस ऑफर करत आहे.
Altroz च्या पेट्रोल MT आणि डिझेल या दोन्ही प्रकारांवर एकूण 35,000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. त्यावर 25,000 रुपयांची ग्राहक सूट आणि 10,000 रुपयांची एक्सचेंज सूट उपलब्ध आहे. Altroz ग्राहकांना 10,000 रुपयांची सवलत आणि CNG आणि DCA प्रकारांवर 20,000 रुपयांची एक्सचेंज/स्क्रॅपेज देत आहे.
टियागो आणि टिगोरवर किती सूट?
Tiago CNG (MT AMT) वर 15,000 रुपयांची ग्राहक सूट उपलब्ध आहे. हायर-स्पेक XT (O), XT आणि XZ ट्रिम्सवर 35,000 रुपयांची सूट मिळत आहे आणि इतर व्हेरिएंटवर 25,000 रुपयांची सूट मिळत आहे. टिगोरच्या बाबतीत, त्याच्या सीएनजी व्हेरियंटवर 20,000 रुपयांची ग्राहक सूट मिळत आहे. XZ आणि XM ट्रिम्सवर 30,000 रुपये आणि इतर प्रकारांवर 20,000 रुपयांची सवलत आहे. Tiago आणि Tigor या दोन्हींवर 10,000 रुपयांची एक्सचेंज/स्क्रॅपेज सूट उपलब्ध आहे.