Mahindra Electric Car:- महिंद्रा अँड महिंद्रा ही भारतातील कार उद्योग क्षेत्रातील अग्रगण्य आणि प्रसिद्ध अशी कंपनी असूनही वाहन निर्मिती क्षेत्रातील एक मोठे नाव आहे. या कंपनीच्या माध्यमातून कारच नाही तर अनेक व्यावसायिक वाहने देखील उत्पादित केले जातात.
परंतु कारच्या दृष्टिकोनातून बघितले तर महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या अनेक कार मॉडेल्स या ग्राहकांमध्ये प्रचंड प्रमाणात लोकप्रिय आहेत. त्यामुळे तुम्हाला देखील महिंद्राची इलेक्ट्रिक कार विकत घ्यायची असेल तर नोव्हेंबर महिन्यात त्यासाठी खूप फायद्याचा ठरू शकतो.
कारण कंपनीने नोव्हेंबर 2024 मध्ये त्यांच्या XUV400 या इलेक्ट्रिक एसयूव्ही कारवर मोठ्या प्रमाणावर सूट जाहीर केलेली आहे. विशेष म्हणजे महिंद्रा कंपनीसाठी ही देशातील पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे.
या कारवर जवळपास तीन लाख रुपयापर्यंतची सूट कंपनी देत असून यामध्ये कॅश डिस्काउंट तसेच ॲक्सेसरीज व बोनस, कार्पोरेट सूट व इतर व्हेरिएटचे फायदे देखील मिळण्याची शक्यता आहे.
काय आहेत महिंद्रा XUV400 हे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन?
महिंद्राचे जे काही नवीन पीआरओ व्हेरियंट आहे ते EC PRO आणि EL PRO व्हेरियंटच्या नावाने लॉन्च करण्यात आले असून या नवीन इलेक्ट्रिक कारमध्ये अपडेटेड डॅशबोर्ड, अनेक नवनवीन फीचर्स तसेच ड्युअल टोन थीम आणि अगोदर पेक्षा अधिक तंत्रज्ञानाने ही कार सुसज्ज आहे.
तसेच या कारमध्ये जो काही जुना डॅशबोर्ड आणि क्लायमेट कंट्रोल पॅनल होता तो आता डिझाईन करून अधिक अपडेटेड करण्यात आलेला आहे. डॅशबोर्डच्या पॅसेंजर साईडला आता स्टोरेज नसून त्या जागी पियानो ब्लॅक इन्सर्ट देण्यात आलेला आहे.
तसेच या कारमध्ये XUV700 प्रमाणे स्टेरिंग व्हील देण्यात आले असून केबिनमध्ये देखील अनेक नवनवीन वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये 10.25 इंच टचस्क्रीन सिस्टम, 10.25 इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले देखील देण्यात आलेला आहे.
काय आहेत इतर महत्वाची वैशिष्ट्ये?
तसेच या कारमध्ये ड्युअल झोन एसी, टाईप सी यूएसबी चार्जर आणि मागच्या बाजूला नवीन एसी व्हेंट्सचा समावेश करण्यात आलेला आहे. इतकेच नाहीतर यामध्ये वायरलेस फोन चार्जिंग तसेच सनरूफ, पुश बटन स्टार्ट/ स्टॉप आणि उंची अड्जस्ट करता येईल अशा प्रकारचे ड्रायव्हर सीट यासारख्या सुविधा देण्यात आलेल्या आहेत.
तसेच आता त्यामध्ये पॅनोरेमिक सनरूफ देखील मिळणार आहे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सहा एअर बॅग, रिव्हर्स कॅमेरा तसेच टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल यासारखी वैशिष्ट्ये देण्यात आलेली आहेत.
या इलेक्ट्रिक कार मध्ये 34.5 kWh बॅटरी पॅक देण्यात आला असून त्याची रेंज 375 किलोमीटर आहे आणि दुसरा बॅटरी पॅक हा 39.4 kWh क्षमतेचा असून त्याची रेंज 456 किलोमीटर आहे.