‘या’ आहेत 6 एअरबॅग असलेल्या भारतातील टॉप 3 SUV ! पहा डिटेल्स

Tejas B Shelar
Published:
India's Top SUV

India’s Top SUV : जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात कार खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास राहणार आहे.

विशेषता ज्यांना सेफ्टी एसयूव्ही खरेदी करायची असेल अशा ग्राहकांसाठी आजची बातमी खास राहणार आहे. कारण की, आज आपण भारतातील अशा टॉप तीन एसयुव्ही कार विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

आज आपण ज्या SUV कारची माहिती पाहणार आहोत त्या सर्व गाड्यांमध्ये सहा एअर बॅग राहणार आहेत. तसेच या गाड्यांची किंमत देखील तुमच्या बजेटमध्ये फिट राहणार आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.

ह्युंदाई एक्स्टर : ह्युंदाई ही एक लोकप्रिय ऑटो कंपनी आहे. या कंपनीने आतापर्यंत अनेक कार बाजारात लॉन्च केल्या आहेत. विशेष म्हणजे कंपनीच्या अनेक ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत.

Hyundai India ची Exeter ही देखील कंपनीची एक लोकप्रिय कार आहे. विशेष म्हणजे ही कार खूपच सेफ्टी आहे. यात 6 एअरबॅगची सुरक्षा सुद्धा देण्यात आली आहे.

हे कंपनीचे एक लोकप्रिय आणि सर्वात परवडणारे मॉडेल आहे. बाजारात Hyundai Xter ची एक्स-शोरूम किंमत 6.13 लाख रुपये एवढी आहे. अर्थातच ही सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये फिट होणारी कार आहे.

ह्युंदाई वेन्यू : Hyundai India ने लाँच केलेली ही कार ग्राहकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. कंपनीची ही लोकप्रिय SUV एक सेफ कार म्हणून ओळखली जाते. या लोकप्रिय SUV मध्ये 6-एअरबॅग सुरक्षा देखील दिली गेली आहे.

यामुळे जर तुम्हाला तुमच्या परिवारासाठी सुरक्षित एसयूव्ही कार खरेदी करायची असेल तर हा पर्याय तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहे.

या गाडीच्या किमती बाबत बोलायचं झालं तर भारतीय बाजारात Hyundai Venue ची एक्स-शोरूम किंमत 7.94 लाख रुपये एवढी ठेवण्यात आली आहे.

किया सोनेट : Kia India ची ही एक लोकप्रिय कार आहे. ही SUV कंपनीची भारतात सर्वाधिक विक्री होणारी कार म्हणून ओळखली जाते.

विशेष बाब अशी की भारतात सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या SUV Sonet च्या सर्व प्रकारांमध्ये 6-एअरबॅग सुरक्षा प्रदान केली आहे.

या गाडीच्या किमतीबाबत विचार केला असता ही गाडी भारतात 7.99 लाख रुपये एवढ्या एक्स शोरूम किमतीत लॉन्च करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe