भारतामध्ये बाईक बाजारपेठ ही खूप मोठी असून या बाजारपेठेमध्ये अनेक कंपन्यांच्या माध्यमातून अनेक स्पोर्ट तसेच लॉंग ड्राईव्ह साठी चांगल्या मायलेज देणाऱ्या अनेक परवडणाऱ्या किमतीमधल्या बाईक लॉन्च केलेले आहेत. त्यामुळे ग्राहकांना बाईक निवडीमध्ये जास्त समस्या न येता अनेक नामांकित अशा कंपन्यांकडून वेगवेगळे वैशिष्ट्य असलेल्या बाईक्स लॉन्च करण्यात आलेले आहे.
यामध्ये जर आजकालचे तरुणाई पाहिली तर त्याचा कल हा प्रामुख्याने स्पोर्ट्स बाईककडे असल्याचे आपल्याला दिसून येते. या रेंजमध्ये आपल्याला बुलेट तसेच केटीएम सारख्या बाईक मोठ्या प्रमाणावर वापरताना तरुणाई दिसते.
यामध्ये जर आपण रॉयल एनफिल्ड हिमालयन 450 सारख्या बाईकला जोरदार कडवी टक्कर देऊ शकते अशी एक बाईक येझदी या जागतिक प्रमुख वाहन उत्पादक कंपनीने लॉन्च केलेली आहे.
कंपनीच्या माध्यमातून 2024 जावा Yezdi एडवेंचर बाईक सादर करण्यात आलेली असून ही बाईक न्यू जनरेशन चार कलर पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात आलेली असून यामध्ये सहा स्पीड गिअर बॉक्स देण्यात आलेला आहे.
कसे आहे या बाईकचे इंजिन?
कंपनीच्या माध्यमातून या बाईकमध्ये जावा आणि यझदीच्या इतर बाईक आहे त्याप्रमाणे इंजिन देण्यात आलेले असून अनेक प्रकारचे अपडेट देखील यामध्ये करण्यात आलेले आहेत. रायडरच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या बाईकमध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम देण्यात आलेली आहे व ज्यामुळे बाईकच्या दोन्ही टायर हे ती उच्च वेगात देखील नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते.
तसेच खडबडीत असलेल्या रस्त्यांवर हाय पावर निर्माण करण्यासाठी या बाईकला ३३४ सीसीचे पावरफुल इंजिन देण्यात आलेले आहे. या माध्यमातून ही बाईक 29.6 एचपी पावर आणि 29.9nm टॉर्कसह जबरदस्त परफॉर्मन्स द्यायला सक्षम असून यामध्ये 15.5 लिटरची इंधन टाकी देण्यात आली आहे व जेणेकरून प्रवाशांना लांब मार्गासाठी प्रवास करता येईल.
कसे आहे या बाईकचे मायलेज?
या बाईकच्या मायलेज बद्दल कंपनीने दावा केला आहे की ही बाईक 30 किलोमीटर पर लिटरपेक्षा जास्त मायलेज देण्यास सक्षम असून या बाईकचे वजन 187 किलोग्रॅम आहे. तसेच सीटची उंची 815 मिमी असल्यामुळे पर्वतांवर देखील बॅलन्स राखण्यामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही.
ही बाईक चार रंगांमध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे व हे चार रंग म्हणजे ग्लेशियर व्हाईट, मेग्नाइट मेरून, ओल्फ ग्रे आणि टोर्नाडो ब्लॅक अशा रंगांमध्ये आलेली आहे.
किती आहे या बाईकची किंमत?
या बाईक मध्ये यूएसबी चार्जर तसेच ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, टर्न बाय टर्न नेव्हिगेशन तसेच 220 mm ग्राउंड क्लिअरन्स, स्विच करण्यासारखे एबीएस तसेच ड्युअल डिस्क ब्रेक इत्यादी महत्त्वाची वैशिष्ट्ये देण्यात आलेली आहे व या बाईकची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत साधारणपणे दोन लाख दहा हजार रुपये ठेवण्यात आलेली आहे.