Electric Car : मागील काही काळापासून भारतीय ऑटोबाजारात इलेक्ट्रिक कारला मोठी मागणी आहे. हे पाहता ऑटो क्षेत्रातील आघाडीच्या कार कंपन्या इलेक्ट्रिक कारच्या सेगमेंटवर जास्त लक्ष केंद्रित करत आहेत. तथापि, इलेक्ट्रिक सेगमेंट मार्केटमध्ये टाटा मोटर्सची अजूनही मक्तेदारी आहे. भारतातील एकूण इलेक्ट्रिक कार विक्रीपैकी एकट्या टाटा मोटर्सचा वाटा 70 टक्के पेक्षा जास्त आहे. आज आपण अशाच 5 इलेक्ट्रिक कार बद्दल जाणून घेणार आहोत ज्या ग्राहकांच्या बजेटमध्ये आहेत आणि खिशाला परवडतील अशा आहेत.
MG Comet EV
एमजी मोटरची कॉमेट ईव्ही ही भारतीय बाजारपेठेतील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार मानली जाते. या कारची एक्स-शोरूम किंमत 6.99 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप मॉडेलमध्ये 9.14 लाख रुपयांपर्यंत जाते. ही इलेक्ट्रिक कार एका चार्जवर 230 किलोमीटरची रेंज देते.
MG Comet EV
Tata Tiago EV ही कंपनीची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे. Tata Tiago इलेक्ट्रिक कारची एक्स-शोरूम किंमत 7.99 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप मॉडेलसाठी 11.89 लाख रुपयांपर्यंत जाते. एका चार्जवर ही कार 250 ते 315 किलोमीटरची रेंज देते.
Tata Punch EV
टाटा पंचच्या जबरदस्त यशानंतर कंपनीने अलीकडेच त्याचे इलेक्ट्रिक व्हर्जन लाँच केले आहे. पंच EV ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 10.99 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप मॉडेलसाठी 15.49 लाख रुपयांपर्यंत जाते. टाटा पंच EV एका चार्जवर 315 ते 421 किलोमीटरची रेंज देण्याचा दावा करते.
Tata Tigor EV
कंपनीची Tata Tigor EV ही भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक सेडान कार आहे. Tata Tigor EV ची एक्स-शोरूम किंमत 12.49 लाख रुपयांपासून सुरू होईल आणि टॉप मॉडेलसाठी 13.75 लाख रुपयांपर्यंत जाईल. टाटा टिगोर ईव्ही एका चार्जवर 315 किलोमीटरपर्यंतची रेंज ऑफर करण्याचा दावा करते.
Citroen eC3
आघाडीची फ्रेंच कार उत्पादक कंपनी Citroen ची इलेक्ट्रिक कार eC3 ही भारतातील परवडणाऱ्या डीलपैकी एक आहे. Citroen eC3 ची एक्स-शोरूम किंमत 12.70 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप मॉडेलसाठी 13.5 लाख रुपयांपर्यंत जाते. ही कार एका चार्जवर 320 किलोमीटरची रेंज देण्याचा दावा करते.