वाहन उत्पादक क्षेत्रामध्ये टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा या कंपन्यांचे महत्त्व अनन्यसाधारणा असून या कंपन्यांच्या माध्यमातून उत्पादित करण्यात आलेल्या कार प्रचंड प्रमाणामध्ये विकल्या जातात. ग्राहकांना परवडणाऱ्या किमतींमध्ये किमतीमध्ये उत्तम अशा वैशिष्ट्यांसह कार विकत घेता येतील अशा पद्धतीने त्यांनी वेगवेगळ्या मॉडेलची कारची निर्मिती केलेली आहे.
आजपर्यंत दोन्ही कंपनीच्या माध्यमातून एसयुव्ही श्रेणीतील देखील उत्तम अशा कार आजपर्यंत उत्पादित केल्यावर ग्राहकांना त्या पसंतीस देखील पडल्या.
या एसयूव्ही श्रेणीतील वाहनांचा विचार केला तर टाटा मोटर्सने वीस लाख वाहनांचा विक्रीचा टप्पा गाठला व त्यानिमित्त ग्राहकांप्रती कृतज्ञता म्हणून टाटा मोटर्सने सफारी तसेच हॅरिअर, पंच आणि नेक्सान सारख्या एसयुव्ही श्रेणीतील कारचा समावेश आहे. या वाहनांच्या मदतीने टाटा मोटर्स 20 लाख वाहनांचा टप्पा पार केला.
टाटा मोटर्स या एसयूव्ही श्रेणीतील कार वर देत आहे सवलत
ग्राहकांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना टाटा मोटर्स कडून एसयुव्ही श्रेणीतील काही कारवर बंपर सवलत देण्यात येत आहे. यामध्ये हॅरियर 14 लाख 99 हजार रुपये आणि सफारी 15 लाख 49 हजार रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीवर ग्राहकांना तब्बल एक लाख 40 हजार रुपये पर्यंत सवलत दिली जात आहे.
तर टाटाच्या इलेक्ट्रिक श्रेणीतील नेक्सन ईव्हीवर एक लाख तीस हजार रुपये पर्यंत सवलत दिली जात आहे तर पंच या इलेक्ट्रिक कार वर तीस हजार पर्यंतचा लाभ कंपनीने जाहीर केला आहे.
महिंद्रा अँड महिंद्रा देत आहे या कारवर सवलत
टाटा मोटर्स पाठोपाठ महिंद्रा अँड महिंद्रा या वाहन उत्पादक क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनीने देखील त्यांच्या एसयूव्ही श्रेणीतील लोकप्रिय असलेल्या XUV 700 या कारची किंमत 19 लाख 49 हजार हजार रुपये केली असून तिची मूळ किंमत 21 लाख 54 हजार रुपये होती.
साधारणपणे दोन लाखांची सवलत यावर आपल्याला मिळताना दिसून येत आहे. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या या कारने विक्रीचा दोन लाखांचा टप्पा गाठल्यामुळे तिची सवलतीतील किंमत कंपनीने जाहीर केली आहे. विशेष म्हणजे 10 जुलैपासून पुढील चार महिन्यांच्या कालावधीत ही विशेष किमतीत वाहने ग्राहकांना मिळणार आहेत.