मोठी बातमी ! महिंद्रा कंपनीच्या ‘या’ SUV ची किंमत वाढली, आता ग्राहकांना मोजावे लागणार अधिकचे पैसे

Mahindra SUV Rate : कार घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि थोडीशी चिंताजनक बातमी समोर आली आहे. विशेषता एसयूव्ही कार घेण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्यांसाठी ही बातमी थोडीशी चिंताजनक राहणार आहे. कारण की, देशातील एका प्रतिष्ठित कारनिर्मात्या कंपनीने आपल्या लोकप्रिय एसयूव्हीचे दाम वाढवले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, महिंद्रा कंपनीने आपल्या स्कॉर्पिओ क्लासिक या दमदार SUV च्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे.

यामुळे जर तुम्हीही महिंद्रा स्कॉर्पियो क्लासिक खरेदी करू इच्छित असाल तर तुम्हाला आता आधीच्या तुलनेत अधिकची रक्कम मोजावी लागणार आहे. निश्चितच ही बातमी महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिक प्रेमींसाठी थोडीशी चिंताजनक राहणार आहे. दरम्यान आता आपण महिंद्रा कंपनीने स्कॉर्पिओ क्लासिकच्या किमती किती रुपयांनी वाढवल्या आहेत याविषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

किंमती किती वाढल्यात ?

महिंद्रा अँड महिंद्रा या लोकप्रिय कार निर्मात्या कंपनीने नवीन वर्षात आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. कंपनीच्या माध्यमातून जानेवारी 2024 पासून स्कॉर्पिओसह त्यांच्या निवडक मॉडेल्सच्या किमती वाढवल्या गेल्या आहेत. दरम्यान स्कॉर्पिओ क्लासिक बाबत बोलायचं झालं तर कंपनीने या 3-लाइन SUV ची किंमत प्रकारानुसार 33,500 रुपयांपर्यंत वाढवली आहे. यामुळे आता स्कॉर्पिओ क्लासिक खरेदी करू इच्छिणाऱ्यांना अधिकचा पैसा खर्च करावा लागणार आहे.

ही लोकप्रिय कार S आणि S11 नावाच्या दोन प्रकारांमध्ये ग्राहकांसाठी बाजारात उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही गाडी केवळ 2.2-लिटर डिझेल इंजिनसह येते. आता आपण व्हेरिएंटच्या आधारे किती दरवाढ झाली आहे, हे थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कंपनीकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार या गाडीच्या एस व्हेरिएंटच्या किमतीत कमाल 33,500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दुसरीकडे, S11 कार आता 29,199 रुपयांनी महाग झाली आहे. पण S11 CC वेरिएंटच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

सुधारित किमती कशा आहेत

मिळालेल्या माहितीनुसार, दरवाढ केल्यानंतर स्कॉर्पिओ क्लासिक S 7-सीटर आता 13,58,600 या एक्स शोरूम किमतीत बाजारात उपलब्ध होणार आहे. तसेच S 9-सीटर कार 13,83,600 या एक्स शोरूम किमतीत उपलब्ध होणार आहे. दुसरीकडे, S11 कार 17,34,800 या एक्स शोरूम किमतीत उपलब्ध होणार आहे. शिवाय, S11 CC ही गाडी 17,05,601 या एक्स शोरूम किमतीत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe