फक्त 50 हजार रुपये डाऊनपेमेंट करा आणि नवीन मारुती डिझायर घरी घेऊन जा! जाणून घ्या किती मिळेल कर्ज आणि किती भरावा लागेल ईएमआय?

सध्या स्वतःची कार घेणे अगदी सोपे झाले आहे. त्यामागील प्रमुख कारण म्हणजे आता अनेक बँकांच्या माध्यमातून वाहन कर्जाच्या आधारित तुम्ही कार खरेदीवर कर्ज मिळवू शकतात व तुमच्या बजेट मधील डाऊनपेमेंट करून मासिक ईएमआय वर कार खरेदीचे स्वप्न पूर्ण करू शकतात.

Ajay Patil
Published:
maruti new dzire

Maruti New Dzire Finance Plan:- सध्या स्वतःची कार घेणे अगदी सोपे झाले आहे. त्यामागील प्रमुख कारण म्हणजे आता अनेक बँकांच्या माध्यमातून वाहन कर्जाच्या आधारित तुम्ही कार खरेदीवर कर्ज मिळवू शकतात व तुमच्या बजेट मधील डाऊनपेमेंट करून मासिक ईएमआय वर कार खरेदीचे स्वप्न पूर्ण करू शकतात.

अनेक बँकांच्या माध्यमातून आता कार लोन दिले जाते व त्यामुळे स्वतःच्या कार घेण्याचे स्वप्न पूर्ण करता येणे आता शक्य आहे. अगदी याच पद्धतीने तुम्हाला देखील नवीन कार खरेदी करायचे असेल तर तुम्ही मारुती सुझुकीने अलीकडच्या कालावधीत नवीन स्वरूपात लॉन्च केलेली मारुती डिझायर घेऊ शकतात.

मारुती सुझुकी कंपनीने या नवीन डिझायरमध्ये अनेक अपडेट केले असून डिझाईनमध्ये देखील मोठे बदल केले आहेत. ही कंपनीची सेडान सेगमेंट मधील कार असून ही कार मायलेज आणि किंमत इत्यादीमुळे ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पसंतीस उतरली आहे. या कारची जर आपण किंमत बघितली तर बेस मॉडेलची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत सहा लाख 79 हजार एक रुपये तर ऑन रोड किंमत ही सात लाख 64 हजार 275 रुपये होते.

तुमच्याकडे पूर्ण रक्कम नसेल तर तुम्ही कार लोन घेऊन देखील ही कार खरेदी करू शकतात. त्यामुळे या लेखात आपण एक सोपा फायनान्स प्लॅन बघणार आहोत जो तुम्हाला 50 हजार रुपये डाऊनपेमेंट करून ही कार खरेदी करायला मदत करेल.

नवीन मारुती डिझायर 2024 साठीचे डाऊनपेमेंट आणि ईएमआय योजना
नवीन मारुती डिझायरसाठी कर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला डाऊन पेमेंट म्हणून पन्नास हजार रुपये जमा करावे लागतील व पुढील पाच वर्षाकरिता प्रत्येक महिन्याला 15893 रुपयांचा ईएमआय तुम्हाला भरावा लागेल.

जर तुमचे बजेट पन्नास हजार रुपये असेल तर या कारसाठी बँकेकडून तुम्हाला सहा लाख 29 हजार 001 रुपये कर्ज मिळू शकते व या कर्जावर बँक 9.8% वार्षिक व्याजदर तुम्हाला लागू करेल. अशाप्रकारे तुम्ही पाच वर्षासाठी प्रत्येक महिन्याला 15893 रुपये ईएमआय भरून या कारचे मालक होऊ शकतात.

परंतु याकरिता तुमचा सिबिल स्कोर चांगला असणे गरजेचे आहे. जर तुमचा सिबिल स्कोर कमी असेल तर बँक त्यानुसार डाऊनपेमेंटची रक्कम किंवा कर्जाची रक्कम आणि व्याजदरामध्ये बदल देखील करू शकते.

काय आहे या कारमध्ये खास?
मारुती सुझुकीच्या या नवीन मारुती डिझायरमध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि एप्पल कार प्ले सपोर्टसह नऊ इंचाची टचस्क्रीन, रियर व्हेंटसह ऑटो एसी, अनलॉग ड्रायव्हर डिस्प्ले,

वायरलेस फोन चार्जर आणि क्रूझ कंट्रोल सारखी वैशिष्ट्ये दिली आहेत. तसेच विशेष म्हणजे ही पहिली सब कॉम्पॅक्ट सेडान आहे ज्यामध्ये सिंगल पेन सनरूफ दिले आहे.

कसे आहे या कारचे इंजिन?
मारुती डिझायरमध्ये नवीन 1.2- लिटर तीन सिलेंडर झेड सिरीजचे पेट्रोल इंजिन दिले आहे. जे ८२ पीएस पावर आणि 112 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. तसेच हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन किंवा पाच स्पीड एएमटीसह प्रदान केले आहे.

किती आहे या कारचे मायलेज?
या कारचे जर मायलेज बघितले तर ते पेट्रोल एमटी व्हेरियंट हे 24.79 किलोमीटर पर लिटर इतके मायलेज देते. तर पेट्रोल एएमटी व्हेरियंट 25.71 किलोमीटर पर लिटर इतके मायलेज देते. तर सीएनजी व्हेरियंट 30.73 किलोमीटर पर किलो इतके मायलेज देते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe