Maruti Brezza EMI Calculation:- स्वतःची कार असावी हे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपापल्या परीने प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. परंतु बऱ्याचदा आपल्याला एखादी कार आवडते. परंतु त्या कारची किंमत खूप जास्त असल्याने आपल्या आर्थिक बजेटच्या बाहेर असते व आपल्याला कार घेता येत नाही.
परंतु आता विविध बँकांच्या माध्यमातून कार लोन दिले जाते व या लोनची प्रक्रिया अतिशय सहज आणि सोपी करण्यात आल्यामुळे सहजासहजी बँकेच्या अटी जर पूर्ण केल्या तर हे कर्ज उपलब्ध होते.
परंतु कर्ज घेतले म्हणजे आपल्याला त्याची परतफेड करावीच लागते व यामध्ये देखील आपण जर कार लोन घेतले तर एक ठराविक डाऊन पेमेंट करून तुम्ही एखाद्या बँकेकडून किंवा तत्सम वित्तीय संस्थेकडून कर्ज घेऊन कार खरेदी करू शकतात व महिन्याला त्याचा ईएमआय भरून कर्जाची परतफेड करू शकतात.
अगदी याच पद्धतीने तुम्हाला देखील जर कार खरेदी करायची असेल तर तुम्ही मारुती सुझुकीची ब्रेझा खरेदी करू शकतात. मारुती सुझुकी कंपनीची ही कार भारतीय बाजारपेठेमध्ये सर्वात जास्त विक्री होणाऱ्या कारपैकी एक असून बाजारात देखील तिला चांगली मागणी आहे.
सर्वसामान्यांकरिता ही एक बजेट कार असल्यामुळे बरेच जण या कारला पसंती देतात. जर आपण या कारची सुरुवातीची किंमत बघितली तर ती साधारणपणे दहा लाख रुपये पर्यंत आहे व या कारचे जर मिड व्हेरियंट खरेदी करायचा तुमचा विचार असेल तर पंधरा लाख रुपयापर्यंत खरेदी केले जाऊ शकते.
मारुती ब्रेजासाठी किती भरावा लागेल ईएमआय?
तसे पाहायला गेले तर या कारची एक्स शोरूम किंमत आठ लाख 34 हजार रुपयांपासून सुरू होते व 14 लाख 14 हजार रुपये पर्यंत जाते. या कारच्या बेस मॉडेलची ऑन रोड किंमत नऊ लाख 36 हजार रुपये आहे.
या कारचे जर सर्वाधिक विक्री होणारे मॉडेल पाहिले तर ते Zxi Plus( पेट्रोल) हे असून या व्हेरिएंटची ऑन रोड किंमत 14 लाख 55 हजार रुपये आहे. जर तुम्हाला हे मॉडेल खरेदी करायचे असेल तर तुम्हाला बँकेकडून 13 लाख 10 हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध होऊ शकते.
परंतु यामध्ये तुमचा सिबिल स्कोर कसा आहे यावर या कर्जाचे प्रमाण अवलंबून असेल. तुम्ही जर ही कार खरेदी करण्यासाठी एक लाख 46 हजार रुपये डाऊनपेमेंट केले तर ज्या कालावधी करिता तुम्ही कर्ज घेत आहात त्या कालावधीसाठी कर्जावरील व्याजांनुसार एक निश्चित ईएमआय तुम्हाला भरावा लागेल.
कालावधीनुसार भरावा लागणारा ईएमआय
1- चार वर्ष कालावधीकरिता- समजा तुम्ही एक लाख 46 हजार रुपये डाऊन पेमेंट केले व बाकीचे कार लोन चार वर्षासाठी घेतले तर बँक त्यावर नऊ टक्के व्याज आकारात आहे व तुम्हाला यानुसार प्रत्येक महिन्याला 32 हजार 600 रुपयांचा हप्ता भरावा लागेल.
2- पाच वर्ष कालावधी करिता- समजा तुम्ही जर पाच वर्ष कालावधी करिता कार लोन घेतले तर याकरिता तुम्हाला सत्तावीस हजार दोनशे रुपयांचा हप्ता बँकेला भरावा लागेल.
3- सहा वर्ष कालावधी करिता- समजा तुम्ही मारुती ब्रेझा खरेदी करण्यासाठी बँक लोन सहा वर्षासाठी घेतले तर तुम्हाला 23 हजार 600 रुपयांचा हप्ता प्रत्येक महिन्याला भरावा लागेल.
4- सात वर्ष कालावधी करिता- समजा तुम्ही या कारसाठी जर सात वर्ष कालावधीसाठी कार लोन घेतले तर त्यावर नऊ टक्के व्याजदराने तुम्हाला प्रत्येक महिन्याला 21 हजार शंभर रुपये इतका हप्ता भरावा लागेल.