Maruti Cars Discount : मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीकडून जानेवारी 2024 मध्ये त्यांच्या अनेक कारवर आकर्षक बंपर सूट देण्यात येत आहे. तुम्हीही मारुती सुझुकीची कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला देखील या महिन्यात हजारोंची सूट दिली जाईल.
मारुती सुझुकी देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे. त्यांच्या कारला बाजारात प्रचंड मागणी आहे. तरीही मारुती सुझुकीकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्या कारवर मोठी सूट दिली जात आहे.
मारुती सुझुकी इग्निस बंपर ऑफर
मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या इग्निस कारच्या 2024 मधील स्टॉकसाठी 44,000 रुपयांची मोठी सूट दिली जात आहे. तर 2023 च्या स्टॉकसाठी 59,000 रुपयांची सूट दिली जात आहे. तुम्ही देखील इग्निस कार खरेदी करून हजारो रुपयांची बचत करू शकता.
मारुती सुझुकी बलेनो डिस्काउंट
मारुती सुझुकीच्या लोकप्रिय हॅचबॅक बलेनो कारवर ग्राहकांना या महिन्यात हजारोंची बंपर ऑफर देण्यात येत आहे. बलेनो कारवर 2023 च्या स्टॉकसाठी 42,000 हजार रुपयांची सूट दिली जात आहे तर 2024 च्या स्टॉकसाठी 27,000 हजार रुपयांची सूट दिली जात आहे.
मारुती Ciaz डिस्काउंट ऑफर
मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीच्या Ciaz सेडान कारवर देखील या महिन्यात मोठी सूट दिली जात आहे. कारच्या 2023 च्या स्टॉकसाठी 53,000 हजार रुपयांची तर 2024 मधील स्टॉकसाठी 28,000 रुपयांची सूट दिली जात आहे.
मारुती सुझुकी Fronx
मारुती सुझुकी कार निर्मात्या कंपनीकडून त्यांच्या Fronx कारवर जानेवारी 2024 या महिन्यात 2023 मधील शिल्लक स्टॉकसाठी 15,000 रुपयांची सूट दिली जात आहे. तुम्हीही Fronx कार खरेदी करून हजारोंची बचत करू शकता.
मारुती सुझुकी ग्रँड विटारा डिस्काउंट ऑफर
मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनी त्यांच्या ग्रँड विटारा एसयूव्ही कारच्या 2023 मधील स्टॉकवर 35,000 रुपयांची सूट दिली जात आहे. तर ग्रँड विटारा एसयूव्हीच्या 2024 मधील स्टॉकवर 20,000 रुपयांची सूट दिली जात आहे.