Maruti Cars Discount : मार्च महिन्यात अनेक कंपन्यांनी आपल्या कारच्या किंमती कमी केल्या आहेत. अशातच मारुतीने देखील आपल्या काही मॉडेल्सवर सूट दिली आहे. जर तुम्ही सध्या कार घेण्याचा विचार करत असाल तर ही वेळ तुमच्यासाठी उत्तम आहे. आज आम्ही मारुतीच्या अशा जबरदस्त कार्सबद्दल सांगणार आहोत, ज्यावर कंपनी सूट देत आहे.
मारुती नेक्सा डीलरशिपद्वारे आपल्या प्रीमियम कारची विक्री करते. त्याची विक्री वाढवण्यासाठी, कंपनी या महिन्यात म्हणजेच मार्च 2024 मध्ये Nexa डीलरशिप अंतर्गत विकल्या जाणाऱ्या आपल्या कारवर आकर्षक सवलत देत आहे.
कंपनी तुम्हाला MY 2024 वर 87,000 आणि MY 2023 च्या स्टॉकवर 10,000 ते 1.53 लाख रुपयांपर्यंत सवलत देत आहे. जर तुम्ही देखील मारुती कार घेण्याचा विचार करत असाल तर आधी कंपनीच्या कोणत्या कारवर तुम्हाला किती डिस्काउंट मिळत आहे ते जाणून घ्या.
मार्च 2024 मध्ये तुम्हाला मारुती सुझुकी इग्निसवर एकूण 62,000 रुपयांची सूट मिळेल. कंपनी ही ऑफर त्यांच्या MY 2023 स्टॉकवर देत आहे. जर तुम्ही MY 2024 खरेदी केल्यास तुम्हाला 40,000 रुपयांची रोख सूट मिळेल.
कंपनी मारुती बलेनोच्या 2023 आणि 2024 या दोन्ही मॉडेल्सवर 57,000 रुपयांची सूट देत आहे. कंपनीने आपल्या पेट्रोल AGS ट्रिम्सवर सर्वाधिक फायदे देत आहे. तसेच त्याच्या CNG प्रकारावर 25 हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे.
मार्चमध्ये कंपनी Maruti Ciaz च्या संपूर्ण लाइनअपवर 60,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. Maruti Fronx Turbo वर रुपयांपर्यंत 32,000 पर्यंत आणि Velocity Edition वर 43,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. तुम्हाला नियमित 1.2 लिटर फ्रोंक्स 27,000 आणि CNG व्हेरियंटवर 10,000 ची सूट मिळत आहे.
कंपनीने मारुती सुझुकी XL6 च्या पेट्रोल व्हेरिएंटवर 20,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस ऑफर केला आहे. जर आपण Grand Vitara बद्दल बोललो तर कंपनी या कारच्या 2023 च्या स्टॉकवर 1.02 लाख रुपयांपर्यंतचा फायदा देत आहे. त्याच वेळी, त्याच्या 2024 मॉडेलवर 87,000 रुपयांची सूट दिली जात आहे.