Maruti Jimny Discount : मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीकडून आगामी काळात त्यांच्या नवनवीन कार सादर केल्या जाणार आहेत. तसेच मारुती सुझुकी यावर्षी त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार देखील लाँच करणार आहे. मात्र या महिन्यात मारुती त्यांच्या ऑफ रोडींग एसयूव्ही जिमनीवर मोठी सूट देत आहे.
मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीकडून त्यांची शक्तिशाली जिमनी SUV कारवर मोठी सूट देत आहे. तुम्हीही जिमनी एसयूव्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर याच महिन्यात करा. कारण कंपनीकडून या कारवर 1.50 लाखांची मोठी सूट दिली जात आहे.
मारुती सुझुकी जिमनी इंजिन
मारुती सुझुकीकडून त्यांच्या जिमनी एसयूव्ही कारवर मार्च 2024 मध्ये 1.50 लाख रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे. 2023 मधील स्टॉक क्लिअर करण्यासाठी मारुतीकडून ही सूट देण्यात येत आहे. 2024 मधील जिमनी मॉडेलवर कंपनीकडून 50 हजार रुपयांची रोख सूट दिली जात आहे. कॉर्पोरेट सूट म्हणून तीन हजार रुपयांचा अतिरिक्त लाभ देखील दिला जात आहे.
मारुती सुझुकी जिमनी इंजिन
मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या जिमनी एसयूव्ही कारच्या Zeta आणि Alpha मॉडेलमध्ये 1.5 लीटर नॅचरली एस्पिरेटेड इंजिन देण्यात येत आहे. हे इंजिन 103 bhp पॉवर आणि 134.2 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.
मारुती सुझुकी जिमनी वैशिष्ट्ये
मारुती सुझुकीकडून त्यांच्या ऑफ रोडींग एसयूव्ही जिमनी कारमध्ये वॉशर, फॉग लॅम्प, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, क्रूझ कंट्रोल, पुश बटन स्टार्ट/स्टॉप, नऊ इंच टचस्क्रीन डिस्प्ले, वायरलेस अँड्रॉइड ऑटो, ऍपल कार प्ले, आर्किमिस साउंड अशी मानक वैशिष्ट्ये दिली जात आहेत.
तसेच जिमनी एसयूव्हीमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ABS, EBD, ESP, हिल होल्ड असिस्ट, हिल डिसेंट कंट्रोल, रियर पार्किंग कॅमेरा, सहा एअरबॅग्ज, ब्रेक लिमिटेड स्लिप डिफरेंशियल, ब्रेक असिस्ट, साइड इम्पॅक्ट डोअर बीम असे फीचर्स दिले जात आहेत.
मारुती सुझुकी जिमनी किंमत
मारुती सुझुकीची जिमनी एसयूव्ही कार महिंद्रा थारशी स्पर्धा करते. जिमनी एसयूव्ही कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 12.74 लाख रुपयांपासून सुरू होते तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 14.79 लाख रुपये आहे.