Maruti Suzuki Cars Discounts : मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीकडून भारतीय ऑटो मार्केटमध्ये त्यांच्या शानदार कार सादर करण्यात आल्या आहेत. मारुतीच्या कारला बाजारात प्रचंड मागणी आहे. मारुतीकडून नेहमी कमी बजेट कार ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या अनेक कारवर मोठी ऑफर देण्यात येत आहे. तुम्हीही मारुतीच्या कार खरेदी करून लाखो रुपयांची बचत करू शकता. मारुतीकडून 2024 आणि 2023 मध्ये तयार करण्यात आलेल्या कारवर वेगवेगळी ऑफर देण्यात येत आहे.
मारुती सुझुकी इग्निस
मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या इग्निस कारवर देखील मोठी सूट देण्यात येत आहे. इग्निस कारवर 62,000 हजार रुपयांची मोठी सूट दिली जात आहे. तसेच कारवर 40,000 रुपयांची रोख सूट देखील दिली जात आहे.
मारुती सुझुकी बलेनो
मारुती सुझुकीची लोकप्रिय बलेनो कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. कारण या महिन्यात कारवर हजारो रुपयांची सूट दिली जात आहे. कारच्या 2023 आणि 2024 मॉडेलवर 57,000 हजार रुपयांची मोठी सूट दिली जात आहे.
मारुती सुझुकी जिमनी
मारुती सुझुकीकडून अलीकडेच त्यांच्या ऑफ रोडींग एसयूव्ही जिमनीचे नवीन एडिशन लाँच करण्यात आले आहे. मारुती सुझुकी जिमनी एसयूव्हीच्या 2023 मॉडेलवर 1.53 लाख रुपयांची सूट दिली जात आहे. तर 2024 जिमनी एसयूव्ही कारवर 53,000 रुपयांची सूट दिली जात आहे.
मारुती सुझुकी Ciaz
मारुती सुझुकीकडून त्यांच्या लोकप्रिय सेडान कार Ciaz वर देखील या महिन्यात मोठी सूट दिली जात आहे. 2023 च्या Ciaz मॉडेलवर 60,000 हजार रुपयांची सूट दिली जात आहे. तर 2024 मॉडेलवर देखील 60,000 रुपयांची सूट दिली जात आहे.
मारुती सुझुकी ग्रँड विटारा हायब्रीड
मारुती सुझुकी कार कंपनीच्या ग्रँड विटारा एसयूव्ही कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्रँड विटारा कारच्या हायब्रीड व्हेरियंटच्या 2023 मॉडेलवर 1.02 लेख रुपयांची सूट दिली जात आहे तर 2024 मॉडेलवर 87,000 रुपयांची सूट दिली जात आहे.
मारुती सुझुकी Fronx
मारुती सुझुकी कार कंपनीकडून त्यांच्या Fronx कारवर देखील मोठी सूट देण्यात येत आहे. Fronx कारच्या 2023 मॉडेलवर 32,000 रुपयांची सूट दिली जात आहे तर 2024 मॉडेलवर देखील 32,000 रुपयांचीच सूट दिली जात आहे.