आनंदाची बातमी! मारुती सुझुकीच्या ‘या’ एसयूव्हीवर मिळतोय तब्बल 70 हजाराचा डिस्काउंट, आजच बुक करा

Tejas B Shelar
Published:
Maruti Suzuki New SUV Price Drop

Maruti Suzuki New SUV Price Drop : तुम्हीही नजीकच्या भविष्यात नवीन एसयुव्ही खरेदी करण्याच्या तयारीत आहात का? हो ना, मग आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष कामाची ठरणार आहे.

विशेषता ज्यांना मारुती सुझुकीची फ्रोंक्स ही नवीन कार खरेदी करायची असेल अशा ग्राहकांसाठी ही बातमी खास राहणार आहे. कारण की, कंपनीच्या या लोकप्रिय मॉडेलवर मोठा डिस्काउंट ऑफर सुरू आहे. यामुळे ग्राहकांना ही लोकप्रिय गाडी खूपच स्वस्तात खरेदी करता येणार आहे.

परिणामी ग्राहकांचा मोठा पैसा वाचणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मारुती फेब्रुवारी 2024 मध्ये या कारवर 70,000 रुपयांची सूट देत आहे. भारतातील फ्रॉन्क्सच्या किंमती 7.51 लाख रुपयांपासून सुरू होतात. ही कार NA आणि Turbo इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे.

निवडक मारुती सुझुकी डीलरशिप या महिन्यात एरिना आणि नेक्सा श्रेणीतील अनेक मॉडेल्सवर प्रचंड सवलत देत आहेत.

या फायद्यांमध्ये रोख सवलत, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट सूट यांचा समावेश आहे. दरम्यान, आता आपण या डिस्काउंट ऑफर विषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.

कशी आहे डिस्काउंट ऑफर 

मीडिया रिपोर्टनुसार, मारुती सुझुकी कंपनीच्या माध्यमातून आपल्या लोकप्रिय मारुती फ्रॉन्क्स या एसयूव्हीवर 70 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट दिला जात आहे.

या कारच्या टर्बो-पेट्रोल प्रकारात ग्राहकांना फेब्रुवारी महिन्यात 60,000 रुपयांपर्यंतच्या रोख सूट मिळणार आहे. म्हणजेच 60 हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट ग्राहकांना मिळणार आहे. याशिवाय 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस सुद्धा मिळत आहे.

म्हणजे या महिन्यात जर या टर्बो-पेट्रोल वॅरीयंटची गाडी ग्राहकांनी खरेदी केली तर त्यांना 70000 पर्यंतचा डिस्काउंट मिळणार आहे. पण फेब्रुवारी 2024 मध्ये या गाडीच्या NA पेट्रोल प्रकारात कोणताही डिस्काउंट कंपनीकडून दिला जाणार नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe