Maruti Suzuki Wagon R : देशातील ऑटो मार्केटमध्ये मारुती सुझुकीकडून कमी बजेटमध्ये त्यांच्या अगदी शानदार कार सादर करण्यात आल्या आहेत. त्यांच्या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मारुती सुझुकीच्या सर्वच कार कमी बजेट ग्राहकांसाठी उत्तम पर्याय आहेत.
तुमचेही कार खरेदी करण्यासाठी बजेट कमी असेल तर काळजी करू नका. कारण तुम्ही अवघ्या 9 हजार रुपयांमध्ये 5 लाखांची Wagon R सहज खरेदी करू शकता. त्यामुळे कार खरेदी करण्याची एक चांगली संधी आहे.
मारुती सुझुकीकडून त्यांची Wagon R हॅचबॅक कार पेट्रोल आणि CNG पर्यायामध्ये सादर करण्यात आली आहे. कारमध्ये जबरदस्त वैशिष्ट्ये देण्यात आले आहे. मारुती सुझुकीची Wagon R सध्या टॉप 10 कारच्या सर्वाधिक विक्रीमध्ये सामील आहे. कारची दरमहा हजारो युनिट्स विक्री होत आहेत.
मारुती सुझुकी वॅगन आर कार इंजिन आणि वैशिष्ट्ये
मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीच्या वॅगन आर कारमध्ये 1.0-लीटर आणि 1.2-लीटर पेट्रोल असे दोन इंजिन पर्याय देण्यात आले आहेत. कारचे पेट्रोल इंजिन 27 Kmpl आणि CNG इंजिन 35 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. वॅगन आर कारचा वार्षिक देखभाल खर्च 6,000 रुपये आहे.
मारुती सुझुकीकडून वॅगन आर कारमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी दोन एअरबॅग, ABS, EBD, इन्फोटेनमेंट सिस्टम, पॉवर स्टीयरिंग, स्टीयरिंग व्हील लॉक, चाइल्ड लॉक, रियर पार्किंग सेन्सर, सेंट्रल लॉकिंग, इंजिन इमोबिलायझर अशी अनेक मानक फीचर्स देण्यात आले आहेत.
मारुती सुझुकी वॅगन आर किंमत आणि फायनान्स प्लॅन
मारुती सुझुकी वॅगन आर कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 5.54 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 7.42 लाख रुपये आहे. तुमचे ही कार खरेदी करण्यासाठी बजेट नसेल तर काळजी करू नका. कारण वॅगन आर कारवर EMI पर्याय देखील उपलब्ध आहे.
वॅगन आर कारच्या ऑन रोड किमतीवर तुम्ही कर्ज मिळवू शकता. कारच्या बेस मॉडेलची ऑन रोड किंमत 6,09,984 रुपये आहे. तुम्ही कोणतेही डाउनपेमेंट न भरता ही कार घरी आणू शकता.
वॅगन आर कार खरेदीसाठी 7 वर्षांसाठी 9 टक्के दराने कर्ज दिले जात आहे. कर्जाची परतफेड करण्यासाठी दरमहा 8997 रुपयांचा EMI भरावा लागेल. 7 वर्षात तुम्हाला या कर्जावर 2,14,399 रुपये जास्त द्यावे लागतील.