Upcoming Electric Cars : इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये धुमाकूळ घालायला येत आहे MGची ‘ही’ कार; फीचर्स असतील खूपच खास!

Ahmednagarlive24 office
Published:
Upcoming  Cars

Upcoming  Cars : एमजी मोटर्सच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. एमजी हेक्टर ही एसयूव्ही श्रेणीतील कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. MG मोटरने गेल्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी 2024 मध्ये एकूण 4,532 कार विकल्या. तर एमजी मोटरने या वर्षात आतापर्यंत कोणतेही नवीन उत्पादन लाँच केलेले नाही.

दरम्यान, आता कंपनी 2024 साली भारतीय बाजारात 2 नवीन कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये इलेक्ट्रिक कारचाही समावेश आहे. MG मोटरच्या या दोन कारबद्दल जाणून घेऊया…

MG Excelor EV

एमजी मोटर इंडिया सध्या भारतात तिच्या दोन इलेक्ट्रिक कार विकत आहे. यामध्ये एंट्री लेव्हल कॉमेट EV आणि दुसरी प्रीमियम SUV ZS EV समाविष्ट आहे. आता कंपनीने भारतीय बाजारपेठेत आपल्या बहुप्रतिक्षित Excelor EV ला लॉन्च करणार आहे . MG मोटरची आगामी EV बाजारात टाटा नेक्सन ईव्ही, महिंद्रा XUV400 EV आणि आगामी मारुती सुझुकी eVX शी स्पर्धा करेल.

MG Gloster Facelift

MG Motor ने 2020 मध्ये भारतात Gloster SUV लाँच केली होती. आता कंपनी प्रथमच याला मिड-लाइफ अपडेट देणार आहे. कारच्या बाह्यभागात मोठे बदल पाहायला मिळणार आहे. मात्र, आगामी फेसलिफ्ट एसयूव्हीच्या इंजिनमध्ये कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. एमजी ग्लोस्टरमध्ये ग्राहकांना दोन इंजिन पर्याय मिळतात. पहिले इंजिन 2.0 लीटर टर्बो डिझेल इंजिनसह सुसज्ज आहे जे जास्तीत जास्त 161bhp पॉवर आणि 375Nm पीक टॉर्क जनरेट करते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe