New Generation Honda Amaze Car:- होंडा कार इंडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध आणि लोकप्रिय असलेल्या सेडान अमेझ कारच्या थर्ड जनरेशन मॉडेलचा टीजर रिलीज करण्यात आला व सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या टीझर नुसार बघितले तर या नवीन पिढीच्या अमेझमध्ये आता सब कॉम्पॅक्ट सेडानचा पुढचा भाग समोर आला असून यानुसार आपल्याला अंदाज बांधता येतो की या कारमध्ये आता नवीन फ्रंट लुक आणि काही प्रगत असे सुरक्षा वैशिष्ट्ये येतील.
तसे पाहायला गेले तर होंडा कार इंडियाच्या माध्यमातून अनेक लोकप्रिय अशा कार भारतीय बाजारपेठेमध्ये याआधीच लॉन्च करण्यात आलेले आहेत. भारतीय ग्राहकांमध्ये देखील होंडा कार इंडियाच्या अनेक कार मॉडेल्स हे ग्राहकांमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत व आता ही येणारी नवीन पिढीची होंडा अमेझ देखील तितकीच ग्राहकांमध्ये पसंतीची उतरेल याबाबत शंका नाही.
काय राहणार या नवीन पिढीच्या होंडा अमेझमध्ये नवीन वैशिष्ट्ये?
आपण टीझर नुसार बघितले तर या कारचा फ्रंट लूक दाखवण्यात आलेला आहे व यात शार्प स्टायलिंग लाइन्स आणि हेक्सागोनल ग्रील आहेत. तसेच दोन्ही बाजूला एलइडी डीआरएल सह स्लिक एलईडी हेडलाईट्स देण्यात आलेले आहेत.
जे होंडा एलिव्हेट एसयूव्ही सारखे दिसतात. यामध्ये फॉग लॅम्प देखील देण्यात आलेले आहेत. परंतु या कारच्या मागची प्रोफाइल आणि इतर अंतर्गत डिझाईन बद्दल अजून कंपनीच्या माध्यमातून कुठलीही माहिती शेअर करण्यात आलेली नाही.
परंतु एक अंदाज किंवा अपेक्षा अशी आहे की यात नवीन अलोय व्हील्स असतील आणि मागील बंपर आणि टेल लाईटमध्ये देखील काही बदल केले जातील.
सहा एअर बॅग आणि एडीएएस मिळण्याची आहे शक्यता
या टीझरमध्ये फक्त फ्रंट बाजू दाखवण्यात आली असल्यामुळे बाकीच्या गोष्टी अजून समजू शकलेल्या नाहीत व त्यामुळे या कारचे कॅबिन देखील अजून कंपनीच्या माध्यमातून उघड करण्यात आलेली नाही.
परंतु नवीन डॅशबोर्ड लेआउट आणि नवीन केबिन थीम यामध्ये मिळेल अशी एक अपेक्षा आहे. मोठी टचस्क्रीन तसेच वायरलेस फोन चार्जर आणि सिंगल पेन सनरूफ यासारखे नवीन वैशिष्ट्ये या कार मध्ये मिळू शकतात.
तसेच सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या कारला स्टॅंडर्ड सहा इयर बॅग तसेच इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, ऍडव्हान्स ड्रायव्हिंग असिस्ट सिस्टम आणि रियर व्ह्यू कॅमेरा देखील दिला जाऊ शकतो.
किती असू शकते किंमत?
नवीन पिढीच्या या होंडा अमेझची एक्स शोरूम किंमत सात लाख पन्नास हजार रुपयांपर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे. ही कार टाटा टिगोर आणि ह्युंदाई ऑराला टक्कर देऊ शकते.
सध्याच्या होंडा अमेझमध्ये कसे आहे इंजिन?
सध्या असलेल्या होंडा अमेझ कार 1.2 लिटर i-VTEC नॅचरली अस्पिरेटेड पेट्रोल इंजिनसह येते. जी 87.7 एचपी पावर आणि 110 एनएम टॉर्क जनरेट करते.
तसेच ट्रान्समिशन करिता या इंजिनमध्ये पाच स्पीड मॅन्युअल किंवा सीव्हीटी गिअरबॉक्स पर्याय देण्यात आलेला आहे. परंतु आता ही अमेझ फक्त पेट्रोल इंजिन सह येईल. कारण होंडा इंडिया कंपनीने डिझेल इंजन बनवणे बंद केले आहे.