स्पोर्टी लुकसह नवीन Nissan SUV लॉन्चसाठी तयार, असतील ‘हे’ खास फीचर्स!

Ahmednagarlive24 office
Published:
New Nissan Kicks SUV

New Nissan Kicks SUV : निसान लवकरच आपली नवीन SUV कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कपंनीने नुकतेच याबाबत अपडेट दिले आहेत, कंपनीची ही आगामी SUV उत्तम फीचर्ससह बाजारात आणली जाईल, तसेच यामध्ये अनेक अपडेट देखील पाहायला मिळणार आहेत.

कंपनीने त्यांची आगामी Nissan Kicks SUV न्यूयॉर्क मोटर शो 2024 मध्ये कार सादर केली आहे. ग्राहकांना या नवीनतम मॉडेलमध्ये अनेक मोठे फीचर्स पाहायला मिळतील. या SUVमध्ये पूर्वीपेक्षा अधिक बदल असतील. तसेच अनेक वैशिष्ट्ये देखील अनुभवयाला मिळतील.

नवीन Nissan Kicks SUV ची वैशिष्ट्ये आणि लॉन्च तारखेबद्दल बोलायचे झाल्यास, आगामी Kicks ची रचना Mitsubishi XForce सारखीच असेल. ही नवीन Kick SUV एकाच प्लॅटफॉर्मवर बाजारात आणली जाईल. डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर किक्सची रचना मित्सुबिशी एक्सफोर्स सारखीच आहे. या SUV ची फ्रंट आणि साइड प्रोफाइल सारखेच राहतील. यात Xforce प्रेरित ग्लासहाऊस, स्टायलिश टेपरिंग रूफलाइन आणि DRL सह पूर्ण एलईडी हेडलाइट सेटअप मिळणार आहे. एवढेच नाही तर यामध्ये 19 इंची अलॉय व्हील्स दिसू शकतात.

नवीन Nissan Kicks SUV च्या इतर वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, Kicks मध्ये कार कनेक्ट तंत्रज्ञानासह 12.3-इंच इंफोटेनमेंट सिस्टम देखील असेल. त्याच्या डॅशबोर्डबाबतही अनेक महत्त्वाचे बदल होणार आहेत. अशा परिस्थितीत, अहवालावर विश्वास ठेवला तर, कंपनी सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत आपल्या इंटीरियरला प्रीमियम लुक देण्याचा प्रयत्न करत आहे.

तसेच, या कारमध्ये मल्टी-फंक्शनल इन्फोटेनमेंट सिस्टम, टच सेन्सिटिव्ह कंट्रोल, वायरलेस चार्जिंग पॅड, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, 4 यूएसबी पोर्ट, वायरलेस ऍपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी सारखी वैशिष्ट्ये असणार आहेत. याशिवाय, नवीन किक्समध्ये पॅनोरामिक सनरूफ आणि हेडरेस्ट माउंटेड BOSE स्पीकर्स देखील असतील. मात्र, या वाहनाच्या लॉन्च तारखेबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe