आता तुम्हीही खरेदी करू शकता Apache RTR बाईक, किमतीत मोठी घसरण, पहा..

Ahmednagarlive24
Published:

दुचाकी सेक्टरमध्ये अनेक बाईक आहेत. काही स्पोर्टी तर काही मायलेजसाठी खास. सध्या तरुणांमध्ये टीव्हीएस Apache RTR ही बाईक चांगलीच लोकप्रिय आहे. अनेक युवकांकडे ही बाईक आहे. सध्या अनेक कंपन्या आपल्या बाईकची विक्री वाढावी यासाठी विविध स्कीम आणत असतात.

आजकाल टीव्हीएस देखील आपल्या Apache बाईक जास्तीत जास्त विकण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु यासाठी त्यांना काहीतरी वेगळं करावं लागेल याची कंपनीला चांगलीच जाणीव आहे. हे लक्षात घेऊन त्यांनी Apache च्या किंमतीत लक्षणीय कपात केली आहे. चला जाणून घेऊयात –

TVS Apache RTR ची किंमत झाली कमी
Apache बाईक खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी आहे, कारण आजकाल TVS Apache RTR 180 या बाईकची किंमत थोडी कमी झाली आहे. कंपनी सध्या या बाईकवर 5,500 रुपयांची सूट देत आहे. या बाईकची एक्स शोरूम किंमत 1,32,764 रुपये आहे.

तर याची ऑन रोड किंमत 1,55,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते. सध्या सर्वच ऑटोमोबाईल कंपन्या काहीना काही सवलती देत आहेत, त्यामुळे टीव्हीएस अपाचे आरटीआर 180 बाईकवर 5500 रुपयांची सूट देत आहे. ही ऑफर काही दिवसांसाठी वैध आहे. यानंतर लोकांना ही बाईक त्याच किमतीत विकत घ्यावी लागणार आहे.

TVS Apache RTR 180 चे इंजिन आणि मायलेज
या बाइकमध्ये 177.4 सीसीचे शक्तिशाली इंजिन आहे. हे इंजिन 9000 आरपीएमवर 16.78 बीएचपी पॉवर आणि 7000 आरपीएमवर 15.5 एनएम टॉर्क जनरेट करते. तर याचे मायलेज 42 किमी प्रति लीटर आहे. म्हणजेच एक लिटर पेट्रोलमध्ये ते 42 किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकते. या बाईकचा जास्तीत जास्त वेग ताशी 113 Kmph आहे.

TVS Apache RTR 180 बाइकचे फीचर्स
टीव्हीएसने या बाईकमध्ये अनेक शानदार फीचर्स दिले आहेत. यामध्ये डिजिटल इंस्ट्रूमेंट कंसोल, डिजिटल ओडोमीटर, डिजिटल स्पीडोमीटर, फ्यूल गेज, डिजिटल फ्यूल गेज, डिजिटल टेक्नोमीटर, डिजिटल ट्रिप मीटर, गिअर इंडिकेटर आणि लो फ्यूल इंडिकेटर आदी फीचर्सचा समावेश आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe