Hyundai Car Holi Offers : होळीच्या निमित्ताने Hyundai ‘या’ वाहनांवर देत आहे बक्कळ सूट, बघा…

Hyundai Car Holi Offers

Hyundai Car Holi Offers : जरा तुम्ही ह्युंदाई कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. कंपनी होळीच्या निमित्ताने आपल्या काही वाहनांवर मोठी सूट देत आहे. कंपनीच्या या ऑफर अंतर्गत तुम्ही ह्युंदाईच्या गाड्या अगदी स्वस्त दरात खरेदी करू शकता.

कपंनी आपल्या i20 (Hyundai i20), Grand i10 Nios (Hyundai Grand i10 Nios), Aura (Hyundai Aura) आणि Hyundai Venue या गाड्यांवर सवलत देत आहे.

Hyundai Grand i10 Nios

Hyundai च्या Grand i10 Nios कारवर सर्वात मोठी सूट मिळत आहे. कंपनी होळीच्या मुहूर्तावर Hyundai Grand i10 Nios वर मोठी ऑफर देत आहे. या कारवर मिळणाऱ्या डिस्काउंटनंतर तुम्ही 43 हजार रुपये वाचवू शकता. या ऑफरमध्ये 30,000 रुपयांची रोख सवलत, 10,000 रुपयांची एक्सचेंज डिस्काउंट आणि 3000 रुपयांची कॉर्पोरेट सूट समाविष्ट आहे.

Hyundai Aura

Hyundai Aura ही कंपनीची सुंदर आणि आकर्षक दिसणारी सेडान आहे. होळीच्या निमित्ताने कंपनी यावर 20 हजार रुपयांची रोख सूट, 10 हजार रुपयांची एक्सचेंज डिस्काउंट आणि 3000 हजार रुपयांची कॉर्पोरेट सूट देत आहे. ग्राहकांना एकूण 33 हजार रुपयांची सूट मिळणार आहे.

Hyundai Venue

तुम्ही Hyundai Venue खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. कंपनी आपल्या ग्राहकांना होळीच्या निमित्ताने या वाहनावर आकर्षक सवलत देत आहे. कंपनी या एसयूव्हीवर 20 हजार रुपयांची कॅश डिस्काउंट आणि 10 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस देत आहे.

Hyundai i20

तुम्ही Hyundai i20 अगदी कमी किमतीत घरी आणू शकता. होळीच्या निमित्ताने कंपनी या वाहनावर देखील सवलत देत आहे. या कारवर 25 हजार रुपयांची सूट मिळत आहे. या ऑफरमध्ये 15,000 रुपयांची रोख सवलत आणि 10,000 रुपयांच्या एक्सचेंज बेनिफिटचा समावेश आहे. परंतु यावर कॉर्पोरेट सूट मिळणार नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe