या दिवाळीत सात सीटर कार घ्यायचा प्लॅन आहे का? 10 लाखांपेक्षा कमी किमतीत मिळतील या कार! मिळेल फायदाच फायदा

Published on -

Seater car : सध्या सणासुदीचे दिवस सुरू असून दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळीच्या कालावधीमध्ये अनेक प्रकारची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्यासोबतच दिवाळीच्या मुहूर्तावर वाहनांची खरेदी करण्याकडे बऱ्याच जणांचा कल असतो.

त्यामुळे प्रत्येक जण आपल्या बजेट मधील वाहनाच्या शोधात असतात. त्यातल्या त्यात जर कार घ्यायची असेल तर प्रामुख्याने बजेट आणि आपल्या कुटुंबातील सदस्य यांचा विचार करून कारची निवड करण्याकडे कल असतो.

म्हणजेच कुठे जायचे राहिले तर आपले पूर्ण कुटुंबातील सदस्यांना जाता येईल हा दृष्टिकोन त्यामागे असतो. परंतु कार घेताना बजेट पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे असते. समजा या अनुषंगाने जर तुम्हाला सात सीटर कार घ्यायची असेल व तीही तुमच्या बजेटमध्ये तर या लेखामध्ये आपण अशाच काही दहा लाख रुपये पेक्षा कमी किमतीतल्या 7 सीटर कार विषयी माहिती बघणार आहोत.

दहा लाखांपेक्षा स्वस्त आहेत या सात सीटर कार

1- मारुती सुझुकी इको- ही भारतातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार असून ही कार मारुती सुझुकी या वाहन निर्मिती कंपनीचे आहे. जर आपण या कारच्या एक्स शोरूम किमतीचा विचार केला तर ती पाच लाख 56 हजार रुपयांपासून सुरू होते. ही कार तुम्हाला पेट्रोल आणि सीएनजी या पर्यायांमध्ये मिळते.

2- महिंद्रा बोलेरो निओ- महिंद्रा बोलेरो नियो सात सीटर कार मधील एक उत्तम कार असून या कारची एक्स शोरूम किंमत नऊ लाख 64 हजार रुपयांपासून सुरू होते. या कारमध्ये कॉम्पॅक्ट एसयूव्ही फीचर्स असून मायलेज च्या बाबतीत देखील ही खूप फायदेशीर आहे.

3- मारुती सुझुकी एर्टिगा- बाजारपेठेमध्ये उपलब्ध असलेल्या सात सीटर कारचा विचार केला तर यामध्ये ही प्रथम क्रमांकावर असलेली व सर्वात जास्त खप असलेली कार आहे. या कारची एक्स शोरूम किंमत आठ लाख 64 हजार रुपयांपासून सुरू होते. ही एक एमपीव्ही मायलेज मध्ये देखील चांगली कार आहे.

4- महिंद्रा बोलेरो- महिंद्रा अँड महिंद्राचे सर्वात स्वस्त सात सीटर कारचा विचार केला तर यामध्ये महिंद्रा बोलेरो एक परवडणारी आणि उत्तम अशी कार आहे. या कारची एक्स शोरूम किंमत नऊ लाख 79 हजार रुपयांपासून सुरू होते. महिंद्र बोलेरोचा लुक आणि तिच्यात असलेले वैशिष्ट्ये व स्पेस हे इतर कार पेक्षा खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

5- एमपीव्ही रेनॉल्ट ट्रिबर(Renault Triber)- ही कार देखील दहा लाख पर्यंतच्या किमतीमध्ये अत्यंत परवडणारी सात सीटर कार आहे. विशेष म्हणजे या कारला ग्लोबल एनसीएपीकडून चार सेफ्टी रेटिंग देखील देण्यात आलेले आहेत. या कारची एक शोरूम किंमत सहा लाख तीस हजार ते आठ लाख 97 हजार रुपयांच्या दरम्यान आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!