अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बनवली इलेक्ट्रिक बाइक कमी किमतीमध्ये कमी वेळेतील चार्जिंगसह विविध सुविधा

Published on -

संगमनेर (प्रतिनिधी) – सध्या संगणकीय बरोबर एआयचे युग आले असून नवीन तंत्रज्ञानाबरोबर राहताना अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बाजारातील इतर इलेक्ट्रिक बाइक पेक्षा कमी किंमतीमध्ये व कमी वेळेत चार्जिंग होऊन जास्त मायलेज देणाऱ्या इलेक्ट्रिक बाइक बनवली असून यामध्ये मोबाईल कनेक्टिव्हिटी, लायसन ओळख प्रणाली यासह विविध सुविधा देण्यात आले आहेत

अमृतवहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तिसऱ्या वर्षातील “टीम ट्रायडेंट”ने SIEP ई-बाइक बनवली असून या इलेक्ट्रिक बाइक ची पाहणी संस्थेच्या विश्वस्त सौ शरयूताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य डॉ. एम ए व्यंकटेश, अकॅडमी डायरेक्टर डॉ जे बी गुरव, विभागप्रमुख डॉ व्हि.डी वाकचौरे, डॉ सुनील कडलग आदींसह शिक्षक उपस्थित होते.

नवी दिल्ली येथील नोएडा विद्यापीठात होणाऱ्या आयएसआय इंडिया या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेने नवकल्पना व उद्योजकतेला चालना देण्यासाठी आयोजित प्रदर्शनामध्ये या बाईकचा समावेश करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे नेतृत्व तनिष्क वडनेरे व मयुर पालवे केले आहे त्यांना. मेकॅनिकल विभाग प्रमुख डॉ. व्ही. डी. वाकचौरे, प्रो. योगेश गुंजाळ व इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख डॉ. एस. एस. कडलग, ए. के. पाठक यांनी मार्गदर्शन केले आहे .प्राचार्य डॉ. एम. ए. वेंकटेश यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प विकसित केला आहे. याशिवाय, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे साहेब यांनी देखील प्रकल्पाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

या ई-बाइकमध्ये फक्त ७.९ सेकंदात ० ते ८० किमी/तास गती, GPS ट्रॅकिंग, मोबाइल कनेक्टिव्हिटी आणि सुरक्षित वाहनचालनासाठी लायसन्स ओळख प्रणालीची सुविधा आहे. २ तास ४० मिनिटांत पूर्ण चार्ज होणारा हा बाईक ९० किमी पर्यंतची रेंज देतो. शिवाय, ICE वाहनांसाठी किफायतशीर दरात रेट्रोफिटिंग किटसुद्धा यात आहे.

यावेळी बोलताना सौ शरयूताई देशमुख म्हणाल्या की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेतील विद्यार्थ्यांना संशोधनासाठी सातत्याने प्रोत्साहन दिले जात आहे. विद्युत वाहनांचा (EV) महत्त्व आजच्या काळात खूप वाढलेले आहे. पर्यावरणपूरक असलेले हे वाहन ऊर्जा कार्यक्षमतेच्या दृष्टीने आदर्श असून, प्रदूषण कमी करण्यास मोठी मदत करतात. या प्रकल्पाद्वारे विद्युत वाहनांच्या या वैशिष्ट्यांना आणखी उजाळा मिळेल आणि भविष्यातील स्वच्छ, टिकाऊ वाहतूक व्यवस्थेत नव्या दृष्टीकोनाचा विकास होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या नवीन ई बाईकचे उपकरण बनवल्याबद्दल या सर्व विद्यार्थ्यांचे माजी शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, मा. आ. डॉ सुधीर तांबे, संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ शरयू ताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य डॉ एम ए वेंकटेश, अकॅडमी डायरेक्टर डॉ.जे बी गुरव, आदींसह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News