Tata CNG Cars : टाटाच्या या 4 CNG गाड्यांनी लावले ग्राहकांना वेड ! देतात 27 Kmpl मायलेज, किंमतही खुपच कमी…

Tata CNG Cars

Tata CNG Cars : टाटा मोटर्सकडून वाढत्या CNG कारची मागणी पाहता त्यांच्या अनेक नवनवीन CNG कार भारतीय ऑटो मार्केटमध्ये सादर केल्या आहेत.

टाटाच्या CNG कारने ग्राहकांना वेड लावले आहे. कमी किमतीत शानदार मायलेज देणाऱ्या टाटाच्या कार सुरक्षेच्या बाबतीत उत्तम मानल्या जात आहेत.

टाटा मोटर्सकडून त्यांचा CNG कार सेगमेंट मजबूत करण्यासाठी नवनवीन कार लाँच केल्या जात आहेत. टाटा सध्या मारुती सुझुकीच्या CNG कार सेगमेंटला टक्कर देताना दिसत आहे. टाटाकडून आतापर्यंत भारतीय ऑटो मार्केटमध्ये चार CNG कार सादर करण्यात आल्या आहेत.

टाटाच्या सर्वच कारमध्ये जबरदस्त सुरक्षा फीचर्स देण्यात येत आहेत. त्यामुळे ग्राहकांचा चांगला प्रतिसाद त्यांच्या कारला मिळत आहे. टाटाकडून त्यांच्या CNG कारमध्ये मोठी बूट स्पेस देखील देण्यात येत आहे.

Tigor CNG

टाटा Tigor CNG कार देखील कमी बजेट ग्राहकांसाठी उत्तम CNG कारचा पर्याय आहे. कारची 5 CNG व्हेरियंट बाजारात लाँच करण्यात आली आहेत.

या कारची एक्स शोरूम किंमत 7.80 लाख ते 8.95 लाख रुपये आहे. ही कार 26.49 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. कारमध्ये अलीकडेच AMT गिअरबॉक्स पर्याय देण्यात आला आहे.

टाटा पंच CNG

टाटा मोटर्सकडून गेल्या वर्षी त्यांच्या पंच मिनी एसयूव्ही कारमध्ये CNG व्हेरियंट सादर केले आहे. टाटाकडून Punch CNG एसयूव्हीची 5 व्हेरियंट बाजारात लाँच करण्यात आली आहेत.

पंच CNG कारची एक्स शोरूम किंमत 7.23 लाख रुपये ते 9.68 लाख रुपये आहे. पंच कारचे CNG मॉडेल 26.99 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

Tiago CNG

टाटा मोटर्सकडून अलीकडेच त्यांच्या Tiago CNG कारमध्ये AMT गिअरबॉक्स पर्याय देण्यात आला आहे. या कारची 5 CNG व्हेरियंट बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. Tiago CNG कार 26.49 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. Tiago कारची एक्स शोरूम किंमत 6.60 लाख रुपये ते 8.20 लाख रुपये आहे.

Tata Altroz ​​CNG

टाटाकडून त्यांची प्रीमियम हॅचबॅक Altroz कार देखील CNG सेगमेंटमध्ये सादर करण्यात आली आहे. Altroz कारची 5 CNG व्हेरियंट बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

कारमध्ये ड्युअल CNG सिलिंडर देण्यात आले आहेत. Altroz CNG कारची एक्स शोरूम किंमत 7.60 लाख रुपये ते 10 लाख रुपये आहे. ही कार 26.20 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe