Tata Curvv SUV : टाटा मोटर्स 2024 या चालू वर्षात मोठा धमाका करण्यासाठी सज्ज आहे. टाटा मोटर्सकडून 2024 मध्ये त्यांच्या नवनवीन कार लाॅन्च केल्या जाणार आहेत. टाटाकडून यावर्षी त्यांची नवीन प्लॅटफॉर्मवर Curvv SUV कार लाॅन्च केली जाणार आहे.
भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2024 मध्ये टाटाने त्यांची Curvv एसयूव्ही कार सादर करण्यात आली आहे. एप्रिल 2024 पर्यंत Curvv एसयूव्ही कार भारतीय ऑटो मार्केटमध्ये लॉन्च केली जाऊ शकते. कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत अंदाजे 10.50 लाख रुपये असू शकते.
टाटा Curvv एसयूव्ही कारचे डिझाइन Impact 3.0 तंत्रज्ञानावर आधारित असू शकते. कारमध्ये मोठी लोखंडी जाळी, एलईडी हेडलॅम्प, फ्लश डोअर हँडल, ड्युअल-टोन रूफ, एलईडी टेल लाइट बार आणि 18-इंच अलॉय व्हील पाहायला मिळू शकते.
Curvv एसयूव्ही प्रगत वैशिष्ट्यांसह सुसज्ज
टाटाकडून त्यांच्या Curvv एसयूव्ही कारमध्ये 10.25-इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, टच-सक्षम हवामान नियंत्रण पॅनेल, क्रूझ कंट्रोल, पुश बटण स्टार्ट-स्टॉप, वायरलेस चार्जिंग अशी अनेक वैशिष्ट्ये दिली जाऊ शकतात.
सुरक्षेसाठी कारमध्ये ADAS, ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग, ब्लाइंड स्पॉट असिस्ट, लेन कीप असिस्ट, ॲडाप्टिव्ह क्रूझ कंट्रोल आणि 360 डिग्री कॅमेरा फीचर्स दिले जाऊ शकतात.
टाटा Curvv इंजिन
टाटा मोटर्सकडून त्यांच्या Curvv कारमध्ये 1.2-litre T-GDI टर्बो-पेट्रोल इंजिन दिल जाऊ शकते. हे इंजिन 125 PS पॉवर आणि 225 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. हे इंजिन 7-स्पीड ड्युअल-क्लच ट्रान्समिशनशी जोडलेले असेल. ही कार 18 Kmpl मायलेज देण्यास सक्षम असेल.
Curvv एसयूव्ही कारचे सर्वात प्रथम इलेक्ट्रिक व्हर्जन बाजारात लाँच केले जाईल. ही कार 500 किमी रेंज देण्यास सक्षम असेल. त्यानंतर कारचे ICE मॉडेल बाजारात लाँच केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.