Tata Harrier EV SUV : टाटा मोटर्सकडून भारतीय ऑटो मार्केटमधील इलेक्ट्रिक कार सेगमेंट मजबूत करण्यासाठी अनेक नवीन इलेक्ट्रिक कार लाँच करण्यात येत आहेत. तसेच भारतीय ऑटो मार्केटमध्ये टाटा मोटर्सकडून सर्वाधिक इलेक्ट्रिक कार लाँच करण्यात आल्या आहेत.
इलेक्ट्रिक कारच्या मागणीतील वाढ लक्षात घेता टाटा मोटर्सकडून त्यांच्या नवनवीन इलेक्ट्रिक कार लाँच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टाटा मोटर्स चालू वर्षात त्यांच्या आणखी नवीन इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. यामध्ये त्यांच्या धाक्कड Harrier EV कारचा देखील समावेश आहे. Harrier EV एसयूव्ही कार या वर्षाच्या शेवटी लाँच केली जाऊ शकते.
टाटा मोटर्सने अलीकडेच त्यांच्या Harrier एसयूव्ही कारचे फेसलिफ्ट मॉडेल लाँच केले आहे. आता कंपनीकडून Harrier कारचे EV मॉडेल लाँच केले जाणार आहे. कारमध्ये नवीन फ्रंट ग्रिल, हेडलॅम्प, टेललाइट्स आणि बंपर दिला जाणार आहे.
तसेच Harrier EV एसयूव्ही कारमध्ये काही कॉस्मेटिक बदल देखील तुम्हाला पाहायला मिळतील. इलेक्ट्रिक मोटर आणि बॅटरी पॅकसाठी पुन्हा डिझाईन करण्यात आलेले अलॉय व्हील्स कारमध्ये दिले जातील. Harrier फेसलिफ्ट एसयूव्ही कारसारखाच डॅशबोर्ड, सीट्स आणि इन्स्ट्रुमेंट क्लस्टर इलेक्ट्रिक कारमध्ये पाहायला मिळेल.
टाटा हॅरियर EV बॅटरी पॅक आणि रेंज
टाटा मोटर्स त्यांच्या हॅरियर EV कारमध्ये 40.5 kWh चा बॅटरी पॅक देण्यात असल्याची माहिती मिळत आहे. तसेच या बॅटरी पॅकला 135 kW ची इलेक्ट्रिक मोटर जोडण्यात येऊ शकते जी 250 Nm चा टॉर्क जनरेट करण्या सक्षम असेल.
हॅरियर EV 9 सेकंदात 0-100 किमी/ताशी वेगाने धावू शकते तर कारचा टॉप स्पीड 190 किमी/तास आहे. Harrier EV एसयूव्ही कारची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 6 तासांचा कालावधी लागू शकतो. तसेच कार DC फास्ट चार्जरने 80% चार्ज 30 मिनिटांमध्ये होऊ शकते.
टाटा हॅरियर EV वैशिष्ट्ये आणि किंमत
टाटा मोटर्सकडून त्यांच्या हॅरियर EV एसयूव्ही कारमध्ये 10.4-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 12.3-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 360-डिग्री कॅमेरा, पॉवर-टेलगेट आणि वायरलेस चार्जिंग पॅड अशी मानक वैशिष्ट्ये देण्यात येणार आहेत.
तसेच सुरक्षेसाठी कारमध्ये 6 एअरबॅग्ज, ABS, EBD, ESP, हिल होल्ड कंट्रोलसारखी अनेक फीचर्स दिली जाऊ शकतात. टाटा मोटर्सकडून त्यांच्या हॅरियर EV एसयूव्ही कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 29.99 लाख रुपये ठेवली जाऊ शकते. एकूण पाच व्हेरियंटमध्ये हॅरियर EV कार लाँच केली जाण्याची शक्यता आहे.