Tata Electric SUV : इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वाढणार स्पर्धा…टाटा लवकरच लॉन्च करत आहे सफारीचे इलेक्ट्रिक मॉडेल…

Ahmednagarlive24 office
Published:
Upcoming Tata Electric SUV

Upcoming Tata Electric SUV : भारतीय ऑटोमोबाईल कपंनी टाटा मोटर्स सध्या मार्केटमध्ये उच्च स्थानावर आहे. कपंनी नेहमीच मार्केटमध्ये नवनवीन वाहने आणत असते, अशातच कंपानीची आता आणखी एक नवीन वाहन मार्केटमध्ये आणण्याच्या तयारीत आहे.

अलीकडेच, टाटा कंपनीने टाटा पंचचे इलेक्ट्रिक मॉडेल सादर केले होते, तर आता कंपनी आपल्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या SUV सफारीचे EV मॉडेल लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. अलीकडेच नवीन सफारी चाचणीदरम्यान दिसली यावरून याचा अंदाज लावता येतो. यावेळी शेअर केलेल्या फोटोंवरून टाटाच्या या इलेक्ट्रिक व्हर्जनशी संबंधित फीचर्सचाही अंदाज लावला जाऊ शकतो. चला टाटाच्या आगामी इलेक्ट्रिक एसयूव्ही बद्दल सविस्तर जाणून घेऊया…

Tata Safari EV

टाटा मोटर्सच्या लोकप्रिय एसयूव्हीचे अद्ययावत मॉडेल, टाटा सफारी इलेक्ट्रिकशी संबंधित वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, या ईव्ही एसयूव्ही कारमध्ये कनेक्टेड टेल लॅम्प, मागील वायपर आणि मागील बाजूस शार्क फिन अँटेना यांसारख्या अद्ययावत वैशिष्ट्यांचा समावेश असेल. याशिवाय या SUV मध्ये आणखी काही खास बदल पाहायला मिळतात, जसे की चाकांवर एरो कॅप्स, बाजूंना मोठी चाके, कमानी आणि नवीन अलॉय व्हील्स तसेच दरवाजाच्या पॅनल्सवर ब्लॅक क्लेडिंग दिसेल. डिझाइनच्या बाबतीत सफारी ईव्ही सारखीच दिसते. सध्याची टाटा सफारी EV मध्ये काही विशेष बदल अपेक्षित आहेत.

Tata Safari EV रेंज

Tata Safari EV मधील रेंज क्षमतेबद्दल सांगायचे तर, या EV मध्ये पंच इलेक्ट्रिकपेक्षाही मोठी बॅटरी समाविष्ट केली जाऊ शकते. ही बॅटरी एका चार्जमध्ये 400-500 किलोमीटरची रेंज देण्यास सक्षम असेल. सफारी इलेक्ट्रिक Active.ev प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. हा प्लॅटफॉर्म रियर-व्हील ड्राइव्ह, फ्रंट-व्हील ड्राइव्ह आणि ऑल-व्हील ड्राइव्हला सपोर्ट करतो. तसेच, हा प्लॅटफॉर्म 300 ते 600 किलोमीटरच्या श्रेणीतील बॅटरी पॅकला सपोर्ट करतो.

Tata Safari EV किंमत

Tata Safari EV च्या किंमतीबद्दल बोलताना कंपनीने अद्याप इलेक्ट्रिक व्हर्जनच्या किंमतीचा खुलासा केलेला नाही. परंतु अशी अपेक्षा आहे की कंपनी ही एसयूव्ही 30 लाखांच्या एक्स-शोरूम किंमतीत लॉन्च करू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe