टाटाच्या इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याची सुवर्णसंधी! मिळतील लाखो रुपयांच्या सवलती आणि वाचेल पैसा, वाचा संपूर्ण माहिती

Ajay Patil
Published:
tata punch ev

 

टाटा मोटर्स कार निर्मिती क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी असून या कंपनीच्या विविध कार्सना ग्राहकांकडून देखील मोठा प्रतिसाद मिळतो व या कार ग्राहकांमध्ये प्रसिद्ध देखील आहेत. दर्जेदार व दमदार तसेच चांगले सेफ्टी फीचर्स कार निर्मितीमध्ये टाटा मोटर्स अग्रस्थानी आहे.

गेल्या काही वर्षापासून या कंपनीच्या विविध सेगमेंट मधल्या कार्सना चांगली प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळताना दिसून येत असून मागणी देखील जास्त आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टाटा मोटर्सच्या माध्यमातून अनेक ऑफर देखील राबवल्या जातात व आता जून महिन्यामध्ये टाटा मोटर्सने आपल्या गाड्यांवर अनेक प्रकारच्या आकर्षक सवलती ऑफर केलेले आहेत.

ज्या ग्राहकांना इलेक्ट्रिक कार घ्यायची असेल अशा ग्राहकांसाठी ग्रीन बोनस एक प्रोत्साहनपर ऑफर देण्यात आलेली आहे.या कंपनीच्या काही कार्स खरेदीवर लाखो रुपयांची बचत करता येणे ग्राहकांना शक्य होणार आहे.

 टाटाच्या या इलेक्ट्रिक कार्सवर मिळत आहे विशेष सवलत

1- टाटा टियागो ईव्ही 2023 या वर्षांमध्ये उत्पादित करण्यात आलेल्या सर्व व्हेरियंट मधल्या मॉडेल्स या महिन्यात खरेदी केले तर त्यावर 95 हजार पर्यंत सूट देण्यात येत आहे.

त्यासोबतच 2024 मध्ये उत्पादित झालेल्या टियागो ईव्हीचे लॉन्ग रेंज व्हेरिएंट 75 हजार रुपये पर्यंतच्या सवलतींसह ऑफर केले जात असून गेल्या महिन्यात 52 हजार पर्यंतची सवलत या कारवर दिली जात होती. टियागो ईव्हीची एक्स शोरूम किंमत सात लाख 99 हजार ते 11 लाख 89 हजार रुपये पर्यंत आहे.

2- टाटा पंच ईव्ही जून महिन्यामध्ये या कारच्या खरेदीवर दहा हजार रुपयापर्यंतची सवलत दिली जात असून टाटाच्या इतर ईव्हीवर मिळणाऱ्या सवलतींच्या तुलनेमध्ये मात्र टाटा पंच ईव्हीवर खूप कमी सवलत मिळत आहे.

टाटा पंच इलेक्ट्रिक एसयूव्ही ही दोन बॅटरी पॅक पर्यायांमध्ये उपलब्ध असून यातील 25kWh क्षमतेचा युनिट  315 किलोमीटरची तर 35kWh क्षमतेचा युनिट 421 किलोमीटर पर्यंतचे रेंज देते. टाटा पंच ईव्हीची एक्स शोरूम किंमत दहा लाख 99 हजार रुपयांपासून ते पंधरा लाख 49 हजार रुपयापर्यंत आहे.

3- टाटा नेक्सन ईव्ही 2023 मध्ये उत्पादित करण्यात आलेली टाटा नेक्सन ईव्ही या महिन्यात एक लाख 35 हजार रुपयांपर्यंतच्या सवलती मध्ये उपलब्ध असून 2024 या वर्षात उत्पादित झालेल्या नेक्सन इव्ही क्रिएटिव्ह+ मिड रेंज व्हेरियंट सोडून इतर सर्व नेक्सन ईव्हीवर 85000 पर्यंत सूट देण्यात आली आहे व या गाडीची एक्स शोरूम किंमत 14 लाख 49 हजार ते 19 लाख 49 हजार रुपये पर्यंत आहे.