Tata Motor : कार खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. विशेषता ज्यांना सीएनजी कार खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी खास राहणार आहे. कारण की, टाटा कंपनीने आपल्या दोन लोकप्रिय कारचे सीएनजी व्हेरियंट बाजारात लॉन्च केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टाटा मोटर्स इंडियाने आपल्या लोकप्रिय टाटा टियागो आणि टाटा टिगोर या दोन मॉडेलचे सीएनजी व्हेरीयंट आज लॉन्च केले आहे. विशेष बाब अशी की, टाटा कंपनीने लॉन्च केलेल्या या भारतातील पहिल्या सीएनजी ऑटोमॅटिक कार आहेत.
खरेतर, टाटा ही भारतातील एक लोकप्रिय कंपनी आहे. इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये कंपनीचा मोठा बोलबाला आहे. भारतात अलीकडे पेट्रोल आणि डिझेल कारपेक्षा इलेक्ट्रिक आणि सीएनजी कार चालवण्यास विशेष पसंती दाखवली जात आहे. यामुळे देशातील अनेक ऑटो कंपन्यांच्या माध्यमातून इलेक्ट्रिक आणि सीएनजी कार लॉन्च केल्या जात आहेत.
याच पार्श्वभूमीवर टाटा मोटर्स कंपनीने सीएनजी ऑटोमॅटिक कार लॉन्च केली आहे. विशेष म्हणजे या गाड्या 28 किलोमीटर प्रति किलोग्रामचे मायलेज देणार असा दावा कंपनीने केला आहे. दरम्यान, आज आपण कंपनीने लॉन्च केलेल्या या दोन्ही ऑटोमॅटिक सीएनजी गाड्यांची किंमत काय आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
टियागो iCNG ऑटोमॅटिक कारची किंमत किती
Tiago iCNG AMT म्हणजे ऑटोमॅटिक व्हेरिएंटची किंमत ही 7 लाख 89 हजार 900 रुपयांपासून सुरू होते. याच्या सुरुवातीच्या मॉडेलची अर्थातच XTA व्हेरिएंटची किंमत 7,89,900 रुपये आहे. तसेच याच्या XZA+ प्रकाराची किंमत 8,79,900 रुपये एवढी ठेवण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे, XZA + DT प्रकारची किंमत 8,89,900 रुपये आणि XZA NRG ची किंमत 8,79,900 रुपये एवढी आहे. मात्र या सर्व किमती एक्स शोरूम आहेत. अर्थातच ऑन रोड प्राईस यापेक्षा अधिक राहणार आहे.
टिगोर iCNG AMT किंमत किती
टाटा टिगोरच्या सीएनजी मॉडेलची किंमत आठ लाख 84 हजार 900 रुपयांपासून सुरू होते. याच्या XZA ची किंमत 8,84,900 रुपयांपासून सुरू होते. तर, XZA+ व्हेरिएंटची किंमत 9,54,900 रुपये आहे. या सर्व किंमती एक्स-शोरूम आहेत. म्हणजे ऑन रोड प्राईस यापेक्षा अधिक राहणार आहे