Tata CNG Car:- सध्या हळूहळू का होईना वाहन उत्पादक किंवा वाहन बाजारपेठेमध्ये पेट्रोल आणि डिझेल वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रिक आणि सीएनजी वाहनांची संख्या वाढताना आपल्याला दिसून येत आहे. यामध्ये इलेक्ट्रिक आणि सीएनजी वाहनांची मागणी दिवसेंदिवस वाढत असून या प्रकारचे वाहन उत्पादनासाठी देखील आता महत्त्वाच्या कंपन्या या शर्यतीत उतरले आहेत.
सीएनजी कारचा विचार केला तर प्रसिद्ध कार उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून सीएनजी प्रकारातील कार लॉन्च करण्यात आलेल्या असून या स्पर्धेमध्ये आता टाटा मोटर्स देखील उतरण्याच्या तयारीत आहे. तसे पाहायला गेले तर टाटा मोटर्सने अनेक मॉडेल सीएनजीमध्ये लॉन्च केलेली आहेत.
टाटाची प्रसिद्ध आणि ग्राहकांमध्ये पसंतीची असलेली Tata Nexon देखील आता सीएनजीमध्ये सादर केली जाणार आहे. या अगोदर टाटा कंपनीच्या माध्यमातून पंच, टाटा टियागो आणि टाटा टिगोर या कार सीएनजी व्हर्जनमध्ये लॉन्च करण्यात आलेले आहेत व आता त्यांच्या सोबतीला Nexon देखील चौथ्या नंबरला सीएनजी पर्यायमध्ये येत आहे.
सध्या टाटा मोटर्सच्या माध्यमातून ही कार पेट्रोल, डिझेल तसेच इलेक्ट्रिक पॉवरट्रेनमध्ये विक्री केली जात आहे. जेव्हा सीएनजी व्हेरियंटमध्ये नेक्सन लॉन्च केली जाईल तेव्हा कार बाजारपेठेमध्ये ही पहिली कार असणार आहे जी सीएनजीसह एकूण चार प्रकारच्या पावर ट्रेनमध्ये उपलब्ध असेल.
कशी राहील टाटाची Nexon CNG?
टाटाच्या इतर मॉडेलप्रमाणे नेक्सन सीएनजीमध्ये ट्वीन सीएनजी सिलेंडर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून मात्र या कारमध्ये टर्बो चार्जेड पेट्रोल इंजिन सह सीएनजी किट देण्यात येणार आहे. नेक्सॉनचे मानक 1.2 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन जे ११८ बीएचपी पावर आणि 170 एनएम पिक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे.
जर आपण या कारचे ट्रान्समिशन पर्याय बघितले तर यामध्ये नेक्सन सीएनजीला पाच स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स मिळण्याची शक्यता आहे व कंपनी तिच्या उच्च प्रकारामध्ये सीएनजी किट्ससह एएमटी गिअरबॉक्स देखील देऊ शकते.
त्यामुळे टाटा नेक्सनने सीएनजी सह स्वयंचलित गिअरबॉक्स आणण्याचे मॅनेजमेंट केले तर ज्या ग्राहकांना सीएनजी कारच्या परवडणाऱ्या किमतीमध्ये स्वयंचलित ट्रान्समिशनची सुविधा हवी आहेत अशा ग्राहकांना ते आकर्षित करू शकते.
कधी लॉन्च होणार टाटा नेक्सन सीएनजी?
ही कार सप्टेंबर 2024 मध्ये भारतीय कार बाजारात दाखल होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत असून मारुती सुझुकी ब्रेझ्झा सीएनजीसी या कारची कडवी टक्कर असणार आहे. जर आपण या कारची किंमत पाहिली तर या कारच्या मानक मॉडेलपेक्षा या सीएनजी प्रकाराची किंमत 60 ते 80 हजार रुपये जास्त असण्याची शक्यता आहे व नेक्सन सीएनजी 20 ते 22 किलोमीटर प्रतिकिलो इतके मायलेज देईल अशी शक्यता आहे.