Tata Nexon CNG : गजब…! जबरदस्त फीचर्ससह टाटा एसयूव्हीचे iCNG मॉडेल लवकर येणार, बघा खासियत..

Tata Nexon CNG : भारतात सीएनजी कारची वेगळीच क्रेझ आहे. सीएनजी कार चांगले मायलेज देतात, ज्यामुळे कार चालवण्याचा खर्चही कमी येतो. देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या एसयूव्ही गाड्यांपैकी टाटा नेक्सॉनचीही सीएनजी आवृत्ती असणार आहे. ग्राहकांना लवकरच Tata Nexon iCNG च्या रूपात भेट मिळू शकते. दिल्ली येथे होणाऱ्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपोमध्ये नेक्सॉन सीएनजीवरून पडदा हटवला जाईल. याशिवाय टाटा सफारीची डार्क एडिश देखील सादर केली जाणार आहे.

पेट्रोल-डिझेल आणि इलेक्ट्रिक सोबतच टाटा मोटर्सची नजर कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसवर (CNG) आहे. आत्तापर्यंत, टाटा मोटर्सने देखील या विभागात मजबूत प्रवेश केला आहे ज्यामध्ये फक्त मारुती आणि ह्युंदाई सारख्या ब्रँडच्या मॉडेल्सचे वर्चस्व होते. टाटा भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपोमध्ये टाटा नेक्सॉन सीएनजी सादर करण्यात येणार आहे. याआधीही कंपनीने त्याचे काही फोटो शेअर केले होते.

तुमच्या माहितीसाठी हे कॉन्सेप्ट वर्जन आहे आणि लवकरच त्याचे रेडी वर्जन जगासमोर आणले जाईल मग ती विक्रीसाठी लाँच केली जाईल. हे नवीन सीएनजी व्हर्जन सध्याच्या नेक्सॉन फेसलिफ्टवर आधारित आहे, तथापि, सीएनजी कार म्हणून त्यात आवश्यक बदल करण्यात आले आहेत. लॉन्च झाल्यानंतर, ही देशातील एकमेव कार असेल जी पेट्रोल, डिझेल, इलेक्ट्रिक आणि सीएनजी या चार वेगवेगळ्या इंधन पर्यायांसह बाजारात उपलब्ध असेल.

Nexon CNG ही देशातील पहिली टर्बो-चार्ज केलेली SUV असेल जी CNG वर चालेल. सीएनजी पर्याय सामान्यतः नॅचरली एस्पिरेटेड (एनए) पेट्रोल इंजिनसह दिला जातो. पण पहिल्यांदाच, टाटा ने 1.2-लिटर टर्बोचार्ज्ड रेव्होट्रॉन इंजिनसह नेक्सॉन i-CNG संकल्पना सादर केली आहे. पेट्रोलवर चालत असताना, हे इंजिन 120 PS ची कमाल पॉवर आणि 170 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. तथापि, सीएनजी मोडमध्ये त्याच्या कार्यक्षमतेत थोडा फरक नक्कीच असेल.

टर्बो पेट्रोल इंजिन असलेले Nexon 5MT, 6MT, 6AMT आणि 7DCA च्या विविध ट्रान्समिशन पर्यायांसह येते. तथापि, त्याच्या CNG प्रकारात तुलनेने कमी ट्रान्समिशन पर्याय असतील.

टाटा मोटर्सने आपल्या नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने सीएनजी कारच्या बूट स्पेसची समस्या जवळपास दूर केली आहे. कंपनी नेक्सॉन सीएनजीमध्ये 30 लीटर ड्युअल सिलेंडर तंत्रज्ञान वापरत आहे. यामध्ये दोन छोटे सिलिंडर देण्यात आले आहेत, ज्यामुळे तुम्हाला बूट-स्पेस म्हणजेच कारमधील ट्रंकमध्ये तडजोड करावी लागणार नाही.

आणखी  कोणती वैशिष्ट्ये पाहायला मिळतील?

Nexon i-CNG मध्ये उत्कृष्ट आणि प्रगत वैशिष्ट्ये असण्याची अपेक्षा आहे. कारण त्याची रेग्युलर व्हर्जन आधीच जबरदस्त सेफ्टी फीचर्सने सुसज्ज आहे. अशा परिस्थितीत, हे व्हर्जन आणखी खास असण्याची अपेक्षा आहे.

किंमत काय असेल?

लाँच करण्यापूर्वी त्याच्या किंमतीबद्दल काहीही सांगणे घाईचे असले तरी नेक्सॉन आयसीएनजी त्याच्या नियमित पेट्रोल व्हेरियंटपेक्षा थोडी महाग असेल. या गाड्यांमध्ये सुमारे 1 लाख ते 1.50 लाख रुपयांचा फरक असू शकतो. सध्या Nexon 8.10 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe