Tata Punch खरेदी करणाऱ्यांना मिळणार मोठी सवलत! ग्राहकांचे किती पैसे वाचणार ?

Published on -

Tata Punch Discount Offer : टाटा मोटर्सच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. खरेतर जानेवारी महिना टाटा मोटरच्या ग्राहकांसाठी खास राहणार आहे.

कारण की, या महिन्यात Tata Motors आपल्या एका लोकप्रिय कारच फेसलिफ्ट वर्जन लाँच करणार आहे. 15 जानेवारी रोजी कंपनी आपल्या लोकप्रिय मायक्रो एसयूव्ही टाटा पंचचे फेसलिफ्ट मॉडेल लाँच करणार अशी माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान ही गाडी लाँच होण्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. कंपनी विद्यमान टाटा पंचचा जुना स्टॉक संपवण्यासाठी मोठी डिस्काउंट ऑफर घेऊन आली आहे. टाटा मोटर्सकडून या महिन्यात पंच गाडीवर तब्बल 50,000 रुपयांपर्यंतची आकर्षक डिस्काउंट ऑफर जाहीर करण्यात आली आहे.

त्यामुळे कमी बजेटमध्ये सुरक्षित आणि फीचर-पॅक कार खरेदी करण्याची ही ग्राहकांसाठी एक उत्तम संधी राहणार आहे. भारतीय बाजारात टाटा पंचची ह्युंदाई एक्सटर, मारुती सुझुकी फ्रॉन्क्स, टोयोटा टायझर, निसान मॅग्नाइट, रेनॉ कायगर आणि सिट्रोएन सी3 या लोकप्रिय मॉडेल्सशी थेट स्पर्धा आहे.

सध्या टाटा पंचची एक्स-शोरूम किंमत 5.50 लाख ते 9.24 लाख रुपये दरम्यान आहे. सवलतीनंतर ही कार आणखी परवडणाऱ्या किमतीत मिळू शकते. टाटा पंचमध्ये 1.2-लिटर रेव्होट्रॉन पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 6,000 rpm वर 86 bhp कमाल पॉवर आणि 3,300 rpm वर 113 Nm पीक टॉर्क निर्माण करते.

या कारमध्ये 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स स्टँडर्ड देण्यात आला असून, ग्राहकांसाठी 5-स्पीड एएमटी (ऑटोमॅटिक)चा पर्यायही उपलब्ध आहे. मायलेजच्या बाबतीत, पंच मॅन्युअल व्हेरिएंटमध्ये 18.97 किमी/लिटर, तर ऑटोमॅटिक व्हेरिएंटमध्ये 18.82 किमी/लिटर मायलेज देतो.

याशिवाय ही कार सीएनजी आणि इलेक्ट्रिक पर्यायांमध्येही उपलब्ध आहे, जे पर्यावरणपूरक पर्याय शोधणाऱ्या ग्राहकांसाठी फायदेशीर ठरतात.

फीचर्सबाबत बोलायचे झाल्यास, टाटा पंचमध्ये 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ऑटो एसी, ऑटोमॅटिक हेडलाइट्स, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी आणि क्रूझ कंट्रोलसारखी आधुनिक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

सुरक्षेच्या बाबतीतही टाटा पंच आघाडीवर आहे. टाटा नेक्सॉन आणि अल्ट्रॉझनंतर, पंचला देखील Global NCAP कडून 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे.

प्रौढ प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पंचला 5-स्टार (16.453 गुण), तर बाल सुरक्षेसाठी 4-स्टार (40.891 गुण) रेटिंग देण्यात आले आहे. एकंदरीत, फेसलिफ्ट लाँचपूर्वी मिळणारी ही सवलत पाहता, टाटा पंच खरेदी करण्याचा हा योग्य काळ मानला जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News