टाटा पंच इलेक्ट्रिक ठरणार गेम चेंजर ! महाराष्ट्रात नव्याने लॉन्च झालेल्या Punch Electric ची ऑन रोड प्राईस काय आहे ? वाचा डिटेल्स

Tata Punch Ev On Road Price : सध्या भारतीय बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची मोठी क्रेज पाहायला मिळत आहे. विशेषता बाजारात इलेक्ट्रिक कार मागणीत आहे. इलेक्ट्रिक कारचे मार्केट दिवसेंदिवस वाढू लागले आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढणाऱ्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत.

यामुळे आता पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या कार वापरण्याऐवजी सीएनजीवर चालणारी किंवा मग इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याकडे ग्राहकांनी आपला मोर्चा वळवला आहे. अशा परिस्थितीत, देशातील अनेक ऑटो कंपन्या या संधीचे सोनं करून पाहत आहेत.

देशातील दिग्गज ऑटो कंपन्या आता इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये आपली उपस्थिती दाखवत आहेत. टाटाने देखील इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये आत्तापर्यंत अनेक गाड्या लॉन्च केल्या आहेत. विशेष म्हणजे नुकत्याच काही दिवसांपूर्वी टाटा पंच इलेक्ट्रिक देखील बाजारात लॉन्च झाली आहे.

या गाडीची बुकिंग देखील सुरू करण्यात आली आहे. या गाडीची बुकिंग फक्त आणि फक्त 21,000 रुपयांच्या टोकन अमाऊंटमध्ये सुरू झालेली आहे. Tata Punch EV ची किंमत 11.99 लाख ते 14.49 लाख रुपयांच्या दरम्यान ठेवण्यात आली आहे.

तर अतिरिक्त 50,000 रुपये भरून तुम्हाला सनरूफ आणि 7.2kW फास्ट चार्जर देखील मिळणार आहे. मात्र, या गाडीची ऑन रोड प्राईस काय राहणार ? हा मोठा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या गाडीच्या ऑन रोड प्राईस बाबत बोलायचं झालं तर मुंबईत टाटा पंच एम्पावर्ड प्लस इलेक्ट्रिक कारची ऑन रोड प्राईस 16.48 लाख रुपये एवढी ठेवण्यात आली आहे.

म्हणजेच टाटा पंच इलेक्ट्रिकच्या टॉप मॉडेलची किंमत राजधानी मुंबईत ही 16.48 लाख रुपये एवढी आहे. ही किंमत Carwale या संकेतस्थळावरून प्राप्त झाली आहे. यामुळे किमती बाबत अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी ग्राहकांनी जवळील डीलर सोबत संपर्क साधने आवश्यक राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe