Tata Punch EV vs Punch ICE : टाटा मोटर्सकडून इलेक्ट्रिक कार सेगमेंटमधील पोर्टफोलिओ वाढवण्यासाठी अलीकडेच पंच EV कार लाँच केली आहे. आतापर्यंत टाटा मोटर्सने त्यांच्या चार इलेक्ट्रिक कार भारतात लाँच करून EV सेगमेंटमध्ये मजबूत वर्चस्व निर्माण केले आहे.
टाटा मोटर्सकडून सर्वात प्रथम पंच मिनी एसयूव्ही कारचे पेट्रोल व्हर्जन भारतात लाँच केले होते त्यानंतर CNG आणि आता इलेक्ट्रिक पंच भारतात सादर करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांपुढे कोणती पंच एसयूव्ही उत्तम आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.


पंच डिझाईन रचना
टाटा मोटर्सकडून त्यांची पंच EV आणि ICE या दोन आवृत्त्या लाँच केल्या आहेत. पंच कारच्या पेट्रोल व्हेरियंटमध्ये स्टेप-डाउनसह DRLs देण्यात आले आहेत तर EV पंचमध्ये सरळ DRLs देण्यात आल्या आहेत. पंच EV मधील फ्रंट हेडलाइट सेटअप हॅरियर आणि सफारी सारखाच आहे.
पंच इंजिन आणि पॉवरट्रेन
पंच मिनी एसयूव्ही कारच्या ICE व्हेरियंटमध्ये सिंगल 1.2-लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 87 bhp पॉवर आणि 115 Nm पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. तर CNG पंच कारमधील इंजिन 72 bhp पॉवर आणि 103 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

टाटा मोटर्सकडून अलीकडेच लाँच केलेल्या पंच EV कारमध्ये दोन बॅटरी पॅक दिले आहेत. पहिला 25 kWh बॅटरी पॅक दिला आहे जो 315 किमी रेंज देण्यास सक्षम आहे तर दुसरा 35 kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे जो 421 किमी रेंज देण्यास सक्षम आहे.
पंच किंमत
टाटा मोटर्सकडून त्यांच्या पंच EV कार 10.98 लाख रुपयांच्या एक्स शोरूम किमतीमध्ये सादर केली आहे. तर पंच EV च्या टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 15.49 लाख रुपये आहे. तसेच पंच कारच्या पेट्रोल व्हेरियंटच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 6.00 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 9.49 लाख रुपयांपर्यंत जाते.













