Tata Upcoming EV Cars : टाटा लॉन्च करणार 500 किमीपेक्षा जास्त रेंज देणाऱ्या 2 इलेक्ट्रिक SUVs, किंमत असणार इतकी

Ahmednagarlive24 office
Published:
Tata Upcoming EV Cars

Tata Upcoming EV Cars : टाटा मोटर्सकडून आगामी काळात त्यांच्या नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. टाटाने त्यांचा भारतीय ऑटो क्षेत्रातील इलेट्रीक कार सेगमेंट मजबूत केला आहे. सध्या टाटाच्या चार इलेक्ट्रिक कार बाजारात उपलब्ध आहेत.

टाटा मोटर्सकडून त्यांचा इलेक्ट्रिक कार सेगमेंट मजबूत करण्यासाठी त्यांच्या आणखी नवीन एसयूव्ही इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्या जाणार आहेत. यावर्षी टाटाकडून त्यांच्या दोन इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्या जाणार आहेत.

Tata Curvv EV

टाटा मोटर्सकडून आगामी काळात त्यांच्या नवीन EV कार लॉन्च केल्या जाणार आहेत. टाटाकडून जुलै-सप्टेंबर 2024 मध्ये त्यांची Curvv EV ची लॉन्च केली जाण्याची शक्यता आहे. कारचे डिझाईन आणि फीचर्स समोर आले आहेत. ही कार ऑटो शोमध्ये अनेकदा सादर करण्यात आली आहे.

कारचे आलिशान डिझाईन ग्राहकांना भुरळ पडणारे आहे. कारमध्ये लक्झरी फीचर्स देण्यात आले आहेत. Curvv EV कारमध्ये पॅनोरामिक सनरूफ, दोन-स्पोक मल्टी-फंक्शन फ्लॅट-बॉटम स्टीयरिंग व्हील, टचस्क्रीन इन्फोटेनमेंटसाठी दोन 10.2-इंच स्क्रीन, इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल असे मानक फीचर्स दिले जातील.

Nexon EV कारपेक्षा Curvv EV कारचा बॅटरी पॅक मोठा असेल. एकदा चार्ज केल्यानंतर Curvv EV कार 500 किमी पेक्षा जास्त रेंज देईल असा दावा करण्यात येत आहे. कारची अंदाजे एक्स शोरूम किंमत 20 लाख रुपये असेल.

Tata Harrier EV

टाटा Harrier EV एसयूव्ही कार ऑटो शोमध्ये सादर करण्यात आली होती. आता ही कार 2024 च्या शेवटी लॉन्च केली जाणार आहे. या कारची अंदाजे एक्स शोरूम किंमत 25 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. हॅरियर फेसलिफ्टसारखीच ही कार असणार आहे. कारमध्ये पॅनोरॅमिक सनरूफ, एलईडी डीआरएलसह स्प्लिट हेडलॅम्प दिले जाणार आहेत.

Harrier EV एसयूव्ही कारमध्ये 12.3-इंच फ्लोटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट आणि 10.2-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, व्हेंटिलेटेड सीट्स, 7 एअरबॅग्ज, पॅनोरॅमिक सनरूफ, जेश्चर-नियंत्रित पॉवर टेलगेट आणि लेव्हल 2 ADAS फीचर्स दिले जाणार आहे.

कारमध्ये मजबूत बॅटरी पॅक दिला जाणार आहे. एकदा चार्ज केल्यानंतर ही कार 500 किमी रेंज देण्यास सक्षम असेल. Gen2 आर्किटेक्चर प्लॅटफॉमवर ही कार तयार करण्यात येणार आहे. टाटाकडून कारच्या बॅटरी पॅक तपशील अद्याप जाहीर केलेला नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe