Tata Motors Car:- भारतीय बाजारपेठेमध्ये अग्रगण्य कार उत्पादकांच्या यादीमध्ये टाटा मोटर्स हे नाव अग्रस्थानी असून टाटा मोटर्सच्या माध्यमातून सादर करण्यात आलेल्या बऱ्याच कार्सला ग्राहकांच्या माध्यमातून भरभरून असा प्रतिसाद मिळताना आपल्याला दिसून आला आहे.
आज देखील मोठ्या प्रमाणावर टाटा मोटरचा ग्राहकवर्ग असून मोठ्या प्रमाणावर ग्राहकांच्या माध्यमातून टाटाच्या कार घेण्याला प्राधान्य दिले जाते. टाटाने आतापर्यंत भारतीय कार बाजारपेठेमध्ये अनेक वैशिष्ट्य असलेले मॉडेल्स लॉन्च केलेले आहेत
व त्यामध्ये टाटाच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारमध्ये टाटा टियागो आणि टाटा टिगोर या कार लोकप्रिय ठरल्या व आता याच दोन्ही कार टाटा टियागो आणि टाटा टिगोर 2025 हा प्रकार लवकरच लॉन्च होणार आहे. टाटा मोटर्स साधारणपणे येणाऱ्या 2025 या वर्षांमध्ये जानेवारी किंवा फेब्रुवारी या महिन्यात या दोन्ही कारचे अपडेटेड मॉडेल लॉन्च करू शकते.
या दोन्ही कारमध्ये आता अनेक नवीन फिचर्स आणि प्रगत तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे.त्यामुळे बाजारावर मजबूत पकड निर्माण करण्यासाठी व ग्राहकांच्या दृष्टिकोनातून या कार फायद्याच्या ठरतील.
टाटा टियागो आणि टिगोर या दोन्ही कार का आहेत खास?
जर आपण टाटा टियागो आणि टिगोर या दोन्ही टाटा मोटर्सच्या कारचा विचार केला तर या बजेट सेगमेंट मधील व पावरफुल असलेल्या कार म्हणून ओळखल्या जातात.
या दोन्ही प्रकारच्या कारचे जे सध्याचे मॉडेल आहे ते साधारणपणे 2020 मध्ये लॉन्च करण्यात आले होते व आता तब्बल पाच वर्षानंतर हे दोन्ही मॉडेल अपडेट केली जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आता यात दोन्ही कार अपडेट झाल्यानंतर त्यांची प्रमुख स्पर्धा ही मारुती स्विफ्ट डिझायर आणि ह्युंदाई ग्रँड i10 Nios सोबत राहील.
या दोन्ही कारमध्ये काय अपडेट केले जाऊ शकते?
या दोन्ही कारमध्ये जर आपण बघितले तर नवीन अपडेट केले जाणार असून हे अपडेट दोन्ही कारच्या बाहेरील भागात रंगांच्या पर्यायासह दिसू शकतात. याशिवाय हेडलाईट आणि टेललाईटमध्ये गडद रंगाची छटा दिसेल अशी एक शक्यता आहे.
तसेच या अपडेटेड कारमध्ये नवीन अलॉय विल्स देण्यात येतील अशी देखील एक शक्यता असून या दोन्ही कारचे इंटेरियरबद्दल बघितले तर त्यामध्ये मागील एसी व्हेंट्स,
फ्रंट सेंटर आर्मरेस्ट, मोठी 10.2- इंच इन्फोटेनमेंट सिस्टम असेल जी वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि एप्पल कार प्ले ला सपोर्ट करेल. याशिवाय सिंगल पेन सनरूफ, वायरलेस चार्जिंग पॅड आणि सात इंच टीएफटी यामध्ये असेल व इन्स्ट्रुमेंट क्लस्टर बघायला मिळेल अशी देखील शक्यता आहे.
कसे असू शकते इंजिन?
टाटाच्या या दोन्ही अपडेटेड नवीन कारचे इंजिन आणि परफॉर्मन्स बद्दल बघितले तर या कारमध्ये 1.2- लिटर तीन सिलेंडर नॅचरल एस्पीरेटेड पेट्रोल इंजिन मिळेल.जे ड्युअल सिलेंडर i-CNG तंत्रज्ञानासह येईल इतकेच नाही तर हे इंजिन दमदार परफॉर्मन्स आणि उत्कृष्ट मायलेज देण्यासाठी सक्षम असेल.
बाहेरील डिझाईनमध्ये बदल करण्यात येईल का?
टाटा मोटरच्या माध्यमातून नुकतेच टाटा पंच आणि टाटा नेक्सन या दोन्ही कार नवीन वैशिष्ट्यांसह लॉन्च करण्यात आले आहेत व ज्यामध्ये बाहेरील डिझाईनमध्ये फारसा बदल करण्यात आलेला नाही.
अगदी याचप्रमाणे आता टाटा टियागो आणि टिगोरच्या बाबतीत देखील बाहेरील डिझाईनमध्ये फारसा बदल केला जाईल अशी शक्यता दिसून येत नाही. या दोन्ही कार मिड लाईफ अपडेट सह लॉन्च केले जाण्याची शक्यता आहे.