Thar 5-Door : महिंद्रा कार उत्पादक कंपनीची लोकप्रिय ऑफ रोडींग एसयूव्ही कार थार यावर्षी भारतात लॉन्च केली जाणार आहे. त्यामुळे थार प्रेमींना नवीन ऑफ रोडींग एसयूव्हीचा पर्याय मिळणार आहे. कारमध्ये अनेक बदल केले जाणार आहेत.
महिंद्रा थार 5 डोअर थार एसयूव्ही कार अनेकदा चाचणी दरम्यान रस्त्यावर दिसून आली आहे. कारच्या व्हीलबेसमध्ये मोठा झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच नवीन थार एसयूव्ही कारमध्ये नवीन फीचर्स देखील जोडले जाणार आहेत.

महिंद्रा अँड महिंद्राचे कार्यकारी संचालक आणि सीईओ, राजेश जेजुरीकर यांनी अधिकृतपणे महिंद्रा 5 डोअर थार कधी लॉन्च होणार याबाबत संकेत दिले आहेत. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर महिंद्रा 5 डोअर थार लॉन्च केली जाण्याची शक्यता आहे.
महिंद्रा 5 डोअर थार डिझाईन
महिंद्रा कार उत्पादक कंपनीची 5 डोअर थारचा व्हीलबेस मोठा असेल. 3-दरवाज्यांच्या मॉडेलप्रमाणे कारचे डिझाईन असेल. मात्र कारचे ग्रिल नवीन डिझाईनसह सादर केले जाईल. तसेच नवीन फ्रंट बंपर इंटिग्रेटेड फॉग लॅम्प दिले जाईल.
नवीन थार एसयूव्ही कारला एलईडी हेडलॅम्प, फॉग लॅम्प, फ्रंट फेंडरवरील साइड इंडिकेटर आणि टेल लॅम्प दिले जाईल. तसेच आकर्षक 19-इंच डायमंड-कट अलॉय व्हील दिले जातील.
इंटेरियर आणि वैशिष्ट्ये
5 डोअर थार कारच्या इंटेरियरमध्ये 10.25-इंच इंफोटेनमेंट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, सिंगल-पेन सनरूफ, लेदरेट सीट अपहोल्स्ट्री, फ्रंट आणि रिअर सेंटर आर्मरेस्ट, मागील एसी व्हेंट्स, पुश-बटण स्टार्ट असे फीचर्स दिले जातील.
महिंद्रा 5 डोअर थार इंजिन
महिंद्रा कार कंपनीकडून 5 डोअर थारमध्ये इंजिन आणि सस्पेंशन सेटअप स्कॉर्पिओ N मधून घेतले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नवीन थारमध्ये 2.0L टर्बो पेट्रोल इंजिन दिले जाईल जे 203 bhp पॉवर आणि 380 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. 130 bhp पॉवर आणि 300 Nm टॉर्क जनरेट करणारे 2.2L टर्बो डिझेल इंजिन देखील कारमध्ये दिले जाईल.