फळबागांच्या विविध कामांकरिता ‘हे’ 2 मिनी ट्रॅक्टर आहेत पावरफुल! कमी खर्चात होईल शेतीचे जास्त काम

शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरण झाले असून यामध्ये ट्रॅक्टर या यंत्राचा वापर सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये केला जातो.तसेच शेतीच्या इतर कामांकरिता विकसित करण्यात आलेली बरीच यंत्रे ही ट्रॅक्टर चलीत असल्यामुळे ट्रॅक्टरचे महत्त्व आणखीनच वाढते.

Ajay Patil
Published:
vst shakti tractor

Powerful Mini Tractor:- शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरण झाले असून यामध्ये ट्रॅक्टर या यंत्राचा वापर सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये केला जातो.तसेच शेतीच्या इतर कामांकरिता विकसित करण्यात आलेली बरीच यंत्रे ही ट्रॅक्टर चलीत असल्यामुळे ट्रॅक्टरचे महत्त्व आणखीनच वाढते.

शेतीच्या विविध कामांकरिता ट्रॅक्टरचा वापर केल्यामुळे शेतीच्या कामांमध्ये वेळ आणि श्रम दोन्ही वाचतो व त्यामुळे शेतकऱ्यांचा खूप मोठा फायदा होतो. त्यातल्या त्यात सध्या फळबागांचे क्षेत्र वाढल्यामुळे फळबागांच्या कामासाठी मोठ्या ट्रॅक्टर ऐवजी छोटी म्हणजेच मिनी ट्रॅक्टर फायद्याचे ठरतात.

त्यामुळे आता बरेच शेतकरी मिनी ट्रॅक्टर खरेदी करण्याकडे वळल्याचे आपल्याला दिसून येते. जर तुम्हाला देखील मिनी ट्रॅक्टर घ्यायचे असेल तर या लेखामध्ये आपण या दोन मिनी ट्रॅक्टरची माहिती घेणार आहोत. जी शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरेल.

हे मिनी ट्रॅक्टर आहेत शेतीसाठी फायद्याचे

1- व्हीएसटी शक्ती 932 डीआय 4WD ट्रॅक्टर- या मिनी ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला 1758 सीसी क्षमतेचे चार सिलेंडर वॉटर कुल्ड इंजिन दिले असून ते 30 हॉर्स पावरची शक्ती निर्माण करते. या मिनी ट्रॅक्टरची कमाल पिटीओ पावर 25 एचपी आहे आणि त्याचे इंजिन 2400 आरपीएम जनरेट करते.

व्हीएसटी शक्ती मिनी ट्रॅक्टरची लोडिंग क्षमता 1250 किलोग्रॅम इतकी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एकाच वेळी जास्तीचा शेतीमाल वाहून नेणे शक्य होते. हे मिनी ट्रॅक्टर पावर स्टेरिंग 9 फॉरवर्ड + 3 रिवर्स गियर सह येतो.

या छोट्या ट्रॅक्टरमध्ये ऑइल एमर्स डिस्क ब्रेक दिले असून हा मिनी ट्रॅक्टर चार चाकी ड्राईव्ह मध्ये येतो. त्या मिनी ट्रॅक्टरची एक्स शोरूम किंमत 5.4 लाख ते सहा लाख रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. या ट्रॅक्टरला कंपनीने पाच वर्षाची वारंटी देखील दिली आहे.

2- कुबोटा L3408 4WD ट्रॅक्टर- कुबोटा कंपनीच्या या ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला 1647 सीसी क्षमतेचे तीन सिलेंडरमध्ये लिक्विड कुल्ड इंजिन पाहायला मिळते. जे 34 एचपीची पावर जनरेट करते. या ट्रॅक्टरची कमाल पिटीओ पावर 30 एचपी आहे व त्याचे इंजिन 2700 आरपीएम जनरेट करते.

या ट्रॅक्टरची हायड्रोलिक क्षमता 906 किलो इतकी ठेवण्यात आलेली आहे. कुबोटा कंपनीने या कॉम्पॅक्ट ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला इंटिग्रल पावर स्टेरिंगसह 8 फॉरवर्ड आणि चार रिव्हर्स गिअर्ससह एक गिअरबॉक्स दिलेला आहे.

या ट्रॅक्टरची एक्स शोरूम किंमत सात लाख 45 हजार ते सात लाख 48 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच कुबोटा कंपनीच्या माध्यमातून या ट्रॅक्टरला पाच वर्षांची वारंटी देखील दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe