Maruti Upcoming SUVs : मारुती सुझुकी देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे. आता मारुतीकडून त्यांच्या नवनवीन एसयूव्ही कार लक्झरी फीचर्ससह लॉन्च केल्या जाणार आहेत. एसयूव्ही कारच्या मागणीत वाढ झाल्याने मारुती त्यांच्या नवीन SUV कार लॉन्च करणार आहे.
मारुती सुझुकी त्यांच्या आगामी एसयूव्ही कारमध्ये इलेक्ट्रिक एसयूव्ही कारचा देखील समावेश आहे. तसेच मारुती त्यांची आणखी एक 7 सीटर कार देखील लॉन्च करणार आहे. मारुतीच्या सर्वच कारला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
1. 7-सीटर मारुती सुझुकी ग्रँड विटारा (Y17)
मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनी त्यांची ग्रँड विटारा एसयूव्ही कार सध्या 5 सीटर पर्यायामध्ये विकत आहे. आता मारुतीकडून त्यांच्या ग्रँड विटारा एसयूव्ही कारचे 7-सीटर मॉडेल लॉन्च केले जाणार आहे. कारमध्ये 1.5L मजबूत हायब्रीड पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते.
सध्या देखील कारमध्ये हाच इंजिन पर्याय देण्यात आला आहे. ग्रँड विटारा 7-सीटर मॉडेलची एक्स शोरूम किंमत 15 लाख रुपयांपेक्षा जास्त असू शकते. 7-सीटर मारुती सुझुकी ग्रँड विटारा कार टाटा सफारी, एमजी हेक्टर प्लस, सिट्रोएन सी३ एअरक्रॉस, महिंद्रा XUV700, ह्युंदाई अल्काझार आणि रेनॉल्टच्या कारशी स्पर्धा करेल.
2. मारुती सुझुकी मायक्रो SUV (Y43)
मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीची ऑटो मार्केटमध्ये लवकरच पहिली मायक्रो एसयूव्ही कार सादर केली जाणार आहे. 2026 किंवा 2027 पर्यंत मारुतीची मायक्रो एसयूव्ही कार लॉन्च केली जाईल. कारमध्ये 1.2L Z सीरीजचे पेट्रोल इंजिन दिले जाईल.
हे इंजिन मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले असेल. मारुती मायक्रो एसयूव्ही कारमध्ये सहा एअरबॅग्ज, नऊ-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, अॅडजस्टेबल हेडरेस्ट्स असे फीचर्स देण्यात येतील.
3. मारुती सुझुकी eVX
मारुती सुझुकी त्यांची पहिली eVXइलेक्ट्रिक एसयूव्ही कार लवकरच लॉन्च करणार आहे. 2023 ऑटो एक्सपोमध्ये ही कार सादर करण्यात आली होती. मारुतीची ही इलेक्ट्रिक एसयूव्ही कार 5 सीटर असेल. कारमध्ये दोन बॅटरी पॅक पाहायला मिळतील.
मारुतीची नवीन इलेक्ट्रिक कार 500 किमी पेक्षा जास्त रेंज देण्यास सक्षम असेल. कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 15 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल.