Upcoming Cars In India : भारतात लॉन्च होणार या 5 लक्झरी कार्स ! मिळणार शक्तिशाली इंजिन, पहा यादी

Ahmednagarlive24 office
Published:

Upcoming Cars In India : भारतीय ऑटो मार्केटमध्ये कारच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. कारच्या मागणीत वाढ झाल्याने अनेक कार उत्पादक कंपन्या त्यांच्या नवनवीन कार सादर करत आहेत.

नवनवीन कार सादर केल्या जात असल्याने भारतीय ऑटो मार्केटचा विस्तार देखील झपाट्याने वाढत आहे.

आजपासून नवीन वर्ष 2024 ला सुरुवात झाली आहे. या नवीन वर्षात अनेक कार उत्पादक कंपन्यांकडून त्यांच्या नवनवीन कार सादर केल्या जाणार आहेत. यामध्ये एसयूव्ही कारचा समावेश आहे. महिंद्रा, मर्सिडीज आणि किआ कार उत्पादक कंपन्यांकडून त्यांच्या कार लॉन्च केल्या जाणार आहेत.

मर्सिडीज बेंझ GLS फेसलिफ्ट

जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनी मर्सिडीज 8 जानेवारी रोजी मर्सिडीज-बेंझ GLS फेसलिफ्ट आलिशान एसयूव्ही कार लॉन्च करणार आहे. या कारमध्ये अनके नवीन बदल पाहायला मिळतील.

मर्सिडीज-बेंझ GLS फेसलिफ्ट कारमध्ये नवीन फ्रंट बंपर, एअर इनलेट ग्रिल्ससह नवीन टेललॅम्प आणि हाय-ग्लॉस ब्लॅक सराउंड असे बदल केले जाणार आहेत. कारमध्ये 3.0 लीटर 6-सिलेंडर पेट्रोल आणि डिझेल इंजिन दिले जाणार आहे.

ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट

ह्युंदाई मोटर्स त्यांची लोकप्रिय एसयूव्ही कार क्रेटाचे फेसलिफ्ट व्हेरियंट 16 जानेवारी रोजी भारतात लॉन्च केले जाणार आहे. क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये पुन्हा डिझाइन केलेले ग्रिल, स्प्लिट प्रोजेक्टर हँडल देण्यात येतील.

क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्हीमध्ये लेव्हल 2 ADAS फीचर्स दिले जाऊ शकते. तसेच 1.5 लिटर टर्बो-पेट्रोल इंजिनसह ही कार सादर केली जाणार आहे.

किआ सोनेट फेसलिफ्ट

किआ कार उत्पादक कंपनीकडून त्यांची सोनेट फेसलिफ्ट एसयूव्ही कार डिसेंबर 2023 मध्ये लॉन्च करण्यात आली आहे. जानेवारी 2024 मध्ये किआ त्यांच्या Sonet फेसलिफ्ट एसयूव्ही कारच्या किमती जाहीर करणार आहे. ही कार टाटा नेक्सॉन, ह्युंदाई व्हेन्यू आणि मारुती सुझुकी ब्रेझा एसयूव्ही कारशी स्पर्धा करेल.

महिंद्रा XUV300 फेसलिफ्ट

महिंद्रा कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या XUV300 एसयूव्ही कारचे फेसलिफ्ट मॉडेल देखील जानेवारी 2024 मध्ये लॉन्च केले जाण्याची शक्यता आहे. नवीन ड्रॉप-डाउन एलईडी डेटाइम रनिंग लॅम्प्स आणि कनेक्टेड एलईडी लाइट बारसह पूर्णपणे नवीन फ्रंट आणि रियर-एंड कारमध्ये दिले जाणार आहे.

कारमध्ये 10.25 इंचाची मोठी टचस्क्रीन दिली जाणार आहे. तसेच XUV300 फेसलिफ्ट कारमध्ये 1.2 लीटर टर्बो पेट्रोल आणि 1.5 लीटर डिझेल इंजिन पर्याय दिला जाणार आहे.

महिंद्रा XUV400 EV फेसलिफ्ट

महिंद्राची एकमेव XUV400 इलेक्ट्रिक एसयूव्ही कार भारतात सादर करण्यात आली आहे. आता महिंद्राकडून त्यांच्या XUV400 EV कारचे फेसलिफ्ट मॉडेल भारतात लॉन्च केले जाणार आहे. कारमध्ये अनेक मोठे बदल केले जाणार आहेत.

XUV400 EV फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये 10.25 इंचाची मोठी इन्फोटेनमेंट स्क्रीन, 10.25 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल दिले जाऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe