दररोज वापराकरिता उत्तम आहेत ‘या’ कमी किमतीतल्या, मजबूत आणि 70 ते 80 किमी मायलेज देणाऱ्या बाईक्स! कराल खरेदी तर नाही होणार पश्चाताप

भारतीय बाईक बाजारपेठेमध्ये अनेक कमीत कमी किमतीमध्ये उत्कृष्ट असे मायलेज तसेच फीचर्स असलेल्या बाईक सध्या उपलब्ध असून भारतातील नामवंत कंपन्यांच्या माध्यमातून त्या लॉन्च करण्यात आलेले आहेत.

Ajay Patil
Published:
tvs redion

Budget Bike In India:- भारतीय बाईक बाजारपेठेमध्ये अनेक कमीत कमी किमतीमध्ये उत्कृष्ट असे मायलेज तसेच फीचर्स असलेल्या बाईक सध्या उपलब्ध असून भारतातील नामवंत कंपन्यांच्या माध्यमातून त्या लॉन्च करण्यात आलेले आहेत.

गेल्या कित्येक वर्षापासून या प्रकारच्या बाईक्सने भारतीय ग्राहकांमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे व आज देखील या बाईक्सची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जाते. जेव्हा कोणीही डेली वापराकरिता बाईक खरेदी करण्याचा विचार करतो तो सगळ्यात अगोदर कमी किमतीमध्ये जास्त मायलेज देणाऱ्या बाईकच्या शोधात असतो.

इतकेच नाही तर इतर फीचर्स देखील उत्तम मिळतील या दृष्टिकोनातून देखील बाईक खरेदी करण्याअगोदर विचार केला जात असतो.

त्यामुळे तुम्हाला देखील कमीत कमी किमतीमध्ये उत्कृष्ट मायलेज आणि चांगले फीचर्स व दररोज वापराकरिता जर बाईक खरेदी करायची असेल तर या लेखामध्ये आपण अशा स्वस्तात मस्त अशा काही बाईकची माहिती थोडक्यात बघणार आहोत. जी तुम्हाला नक्कीच फायद्याचे ठरेल.

या आहेत कमी किमतीत उत्तम मायलेज देणाऱ्या बाईक?

1- होंडा शाइन- होंडा शाईन ही एक होंडा कंपनीचे सर्वात जास्त विकली जाणारी आणि भारतीय ग्राहकांमध्ये अतिशय लोकप्रिय व पसंतीची बाईक म्हणून ओळखली जाते. या बाईकचा लुक आणि परफॉर्मन्स अतिशय जबरदस्त असल्यामुळे ती ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय ठरलेली बाईक आहे.

त्यामुळे आज देखील होंडा शाईनची मागणी मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येते. या बाईकचे इंजिन जर बघितले तर यामध्ये चार स्ट्रोक SI इंजिन देण्यात आले आहे व त्या माध्यमातून ही बाईक 7500 आरपीएम वर साधारणपणे 8.05 एनएमचा टॉर्क जनरेट करते.

महत्त्वाचे म्हणजे ही बाईक साधारणपणे 55 किलोमीटरचे मायलेज देते. या बाईकची जर एक्स शोरूम किंमत बघितली तर साधारणपणे ती 64 हजार 900 रुपयांच्या आसपास आहे.

2- टीव्हीएस स्पोर्ट- टिव्हीएस स्पोर्ट ही टीव्हीएस इंडिया कंपनीची बाईक असून ज्यांना दररोज दैनंदिन वापराकरिता बाईकच्या माध्यमातून प्रवास करावा लागतो अशांसाठी ही उत्तम मायलेज देणारी बाईक खूप फायद्याचे आहे. टीव्हीएस कंपनीच्या बाईक्समध्ये टीव्हीएस स्पोर्टची विक्री मोठ्या प्रमाणावर होते व ग्राहकांमध्ये देखील ही कमी किमतीतली बाईक खूप लोकप्रिय अशी आहे.

या बाईकमध्ये कंपनीने सिंगल सिलेंडर चार स्ट्रोक,फ्युएल इंजेक्शन एअर कुल्ड इंजन दिलेले आहे.ही बाईक 80 किलोमीटरचे मायलेज देते व 90 किमी प्रतितासचा टॉप स्पीड आहे. या बाईकची एक्स शोरूम किंमत 59881 रुपये इतकी आहे.

3- टीव्हीएस रेडिओन-ही टीव्हीएस कंपनीची बाईक असून हिचा आकर्षक लूक तसेच डिझाईन यामुळे ती ग्राहकांमध्ये लोकप्रिय व पसंतीची बाईक आहे. तसेच ही बाईक तिच्या उत्तम मायलेज करता देखील प्रामुख्याने भारतीय बाजारपेठेत ओळखले जाते.

टीव्हीएस कंपनीने या बाईकमध्ये १०९.७ सीसी सिंगल सिलेंडर पेट्रोल इंजिन दिले असून जे ८.०८ पीएस पावर आणि 8.07 एनएमचा टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

ही बाईक साधारणपणे 73 किलोमीटरचे मायलेज देते व यामध्ये एलसीडी इन्स्ट्रुमेंट कन्सोल व इतर उत्कृष्ट अशी सुरक्षा फीचर्स देण्यात आलेले आहेत.या बाईकची एक्स शोरूम किंमत बघितली तर ती 70 हजारापासून ते 83 हजार 620 रुपयापर्यंत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe