दररोजच्या वापराकरिता उत्तम आहे ‘ही’ इलेक्ट्रिक बाइक! कराल एकदा चार्ज तर धावेल 175 किमी; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Oben Rorr EZ Electric Bike:- हळूहळू आता इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढताना दिसून येत असून येणाऱ्या कालावधीत रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची इलेक्ट्रिक वाहने धावताना दिसतील. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर आणि पर्यावरणाचे संतुलन ठेवण्याकरिता इलेक्ट्रिक वाहनांचा वापर हा खूप फायद्याचा ठरणार आहे.

त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील प्रोत्साहन दिले जात असून त्यासंबंधी महत्त्वाची पावले देखील उचलण्यात येत आहेत. यामुळे अनेक इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपन्या अनेक चांगली वैशिष्ट्य असलेल्या कार तसेच बाईक्स व स्कूटरची निर्मिती मोठ्या प्रमाणावर करताना दिसून येत असून ग्राहक देखील मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहन खरेदी करत आहे.

याच अनुषंगाने जर आपण बघितले तर दररोजच्या वापराकरिता तुम्ही देखील एखादी इलेक्ट्रिक बाइक विकत घ्यायचा विचार करत असाल व अशा बाईकच्या शोधात असाल तर तुमच्या करिता ओबन इलेक्ट्रिक Rorr EZ ही बाईक उत्तम असा पर्याय ठरू शकते. विशेष म्हणजे ही बाईक परवडणाऱ्या किमतीत येते व वैशिष्ट्ये मात्र उत्तम अशी देते.

काय आहे खास ओबेन इलेक्ट्रिक Rorr EZ बाईकमध्ये?
या बाईकचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ओबेन कंपनीच्या दाव्यानुसार या बाईकचे जे काही टॉप मॉडेल आहे ते एकदा जर तुम्ही फुल चार्ज केले तर तब्बल 175 किलोमीटर पर्यंत ती धावू शकते. यापेक्षा लोअर व्हेरियंटची रेंज थोडीफार कमी आहे. विशेष म्हणजे तुम्हाला ही बाईक परत चार्ज करण्याची देखील गरज राहणार नाही.

या बाईकला जर तुम्ही एकदा चार्ज केले तर ती जास्त कालावधीपर्यंत टिकते. कंपनीने या इलेक्ट्रिक बाइकचा टॉप स्पीड 95 किलोमीटर प्रतितास इतका दिला असून 3.3 सेकंदामध्ये शून्य ते 40 किमी प्रति तास वेगात ही बाईक चालवता येते. यामध्ये तुम्हाला फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळत असल्यामुळे ही बाईक 45 मिनिटांमध्ये 80% चार्ज होते.

काय आहेत इतर महत्त्वाचे वैशिष्ट्ये?

तीन रायटिंग मोड या बाईकमध्ये देण्यात आले असून उत्तम रायडींगचा अनुभव देण्यासाठी ही इलेक्ट्रिक बाइक चांगला पर्याय असून चार रंगांमध्ये ही बाईक सध्या मिळत आहे. जर या रंगांचा विचार केला तर यामध्ये सर्ज सायन,

इलेक्ट्रो अंबर तसेच लुमिना ग्रीन आणि फोटॉन व्हाईट रंगाचा पर्याय देण्यात आलेला आहे. निओ क्लासिक डिझाईन असलेली ही बाईक असून सध्याच्या तरुणाईचा आणि इतर ग्राहकांचा ट्रेंड पाहता या बाईकचा लुक आणि डिझाईन बनवण्यात आलेली आहे.

किती आहे या बाईकची किंमत?
ही बाईक सध्या बाजारपेठेमध्ये विविध प्रकारच्या व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. जर आपण या इलेक्ट्रिक बाइकच्या 2.6 kWh व्हेरियंटची किंमत पाहिली तर ती एक्स शोरूम 89 हजार 999 रुपये असून 3.4 kWh व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 99999 रुपये तर 4.4 व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत एक लाख 9999 रुपये इतकी आहे.